Breaking News

उध्दव ठाकरेंच्या बाप चोरणारी टोळीला शिंदे गटाचे प्रत्युत्तर, मग शिवाजी महाराज… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरूष

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगांव येथील नेस्को मैदानावर झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये पक्षात फूट पाडणारे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना लक्ष्य करताना दुसऱ्याचे बाप पळविणारी टोळी सध्या सक्रिय असल्याची टीका केली. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि नाव न घेता निवडणूका लढण्याचे आव्हान उध्दव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केले. उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाला शिंदे गटाचे मंत्री दादाजी भुसे यांनी प्रत्युत्तर देत थेट उध्दव ठाकरे यांनाच आव्हान दिले.

रायगडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बंदरे आणि खानिकर्म मंत्री असणाऱ्या दादा भुसे यांना उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना दादा भुसे यांनी थेट सरकारने पूर्वी जारी केलेल्या अध्यदेशाचा दाखला देत बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष असून त्यांचं नाव वापरण्याचा अधिकार सर्वांना असल्याचे सांगत बाळासाहेब हे सर्वांना पित्यासारखेच आहेत असेही म्हणाले.

इतकचं नाही तर बाळासाहेबांचा फोटो न वापरण्याच्या आव्हानाला उत्तर देताना दादा भुसे यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनाच प्रति आव्हान दिले.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सर्व शिवसैनिकांना पित्यासमान आहेत. बाळासाहेब हे शिवसैनिकांना बापासारखे आहेत. सरकारने तसा कायदेशीररित्या शासन आदेश काढून राष्ट्रपुरुष म्हणून घोषित केलेलं आहे. त्यामुळे ते आम्हा सर्वांच्या पित्यासमान आहेत असे प्रत्युत्तर देत दादा भुसे पुढे म्हणाले, देशाचे पिता छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचं दैवत आहे. मी बोलू इच्छित नाही, पण जर फोटो काढण्याचीच गोष्ट असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून जनतेच्या दरबारात जाऊ, मग जनताजनार्दन त्याचा योग्य तो निर्णय करेल.

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून शिंदे गट आणि ठाकरे गटाने निवडणुका लढवण्यास जनताच योग्य तो निर्णय देईल असं सांगताना भुसेंनी छत्रपतींच्या नावाने ठाकरे गटाचं राजकारण चालत असेल तर बाळासाहेबांच्या नावं आम्हीही वापरु शकतो असा युक्तीवाद त्यांनी केला.

Check Also

अतुल लोंढे यांची मागणी,… एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा

लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *