Breaking News

उदय सामंत यांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर, वेदांतबद्दल समजू शकतो पण एअर बस.. तुमच्यापासून दूर गेलो म्हणून इतका वाईट झालो का?

वेदांत-फॉक्सकॉन पाठोपाठ टाटा एअरबस सारखा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. आज शनिवारी दुपारी आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर टीका केली. राज्यातील प्रकल्प बाहेर जात असताना मुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतील का? असे ते म्हणाले होते. या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेत म्हणाले, वेदांत प्रकल्पाबाबत मी त्यांचे आरोप समजू शकतो. पण एअर बसबाबत किती खोटं बोलावं असे प्रत्युत्तर दिले.

यावेळी उदय सामंत म्हणाले, मी काल पत्रकार परिषद घेऊन टाटा एअर बसबरोबर तत्कालिन सरकारने जो पत्रव्यवहार केला असेल किंवा बोलणी झाली असेल त्याचा तपशील जाहीर करावा, अशी विनंती केली होती. माझ्या विनंतीला मान देऊन माजी उद्योगमंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे आज काही कागदपत्रं जाहीर करतील, असं वाटलं होतं. मात्र, आज मीच काही कागदपत्र घेऊन महाराष्ट्राच्या जनते पुढे घेऊन आलो आहे.

मिहानमध्ये टाटाची एक कंपनी कार्यरत आहे. त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २०२० मध्ये पुढाकार घेऊन एअर बससाठी लागणारी जागा मिहानमध्ये मिळेल का? अशा पद्धतीची चौकशी केली होती. त्यानंतर हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी कोणताही प्रयत्न तत्कालीन राज्य सरकारकडून झाला नाही. याउलट विरोधी पक्ष नेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प मिहानमध्ये येण्यासाठी प्रयत्न केला होते. मात्र, राज्य सरकारकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे सरकार गेल्यानंतर त्यांना राग असू शकतो. तसेच एकवेळ मी वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत मी समजून घेऊ शकतो. पण एअर बसबाबत किती खोटं बोलायचं आणि सरकार गेल्याचा राग असला तरी किती खोटं बोलायचं याला काही मर्यादा असतात असा टोलाही आदित्य ठाकरे यांना लगावला.

एअरबसच्या हा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये होणार, असा कोणताही निर्णय झाला नव्हता. तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या काळात ७२ एमओयू करण्यात आले होते. मात्र, ते कागदावरच राहिले. त्यासाठी कोणतीही कॅबिनेट बैठक घेण्यात आली नाही. मात्र, आम्ही तीन महिन्यात १० कंपन्यांसाठी कॅबिनेट बैठक घेऊन २५ हजार ३६८ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता दिली असेही ते म्हणाले.

बल्क ड्रग्जच्या बाबतीतही जे आरोप करण्यात आले, ते खोटे आहेत. हा प्रकल्प आम्ही रायगडमध्येच करतो आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून हे प्रकल्प उभारण्यात येत आहे. ऑरीक सिटीच्याबाबतीतही आज जे आरोप आदित्य ठाकरे यांनी केले, ते खोटे आहेत. या सिटीपासून ९०० मीटरवर समृद्ध महामार्ग आहे. गेल्या अडीच वर्षांपासून तिथे लोक सांगत आहेत की, हा ९०० मीटरचा रस्ता करा. मात्र, त्याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. पण आम्ही तो रस्ता मंजूर केला. हा प्रकल्पही राज्यातून गेला नाही. फक्त केंद्र सरकारकडून जो निधी येणार होता. तो अद्यापर्यंत आलेला नाही. आम्ही त्यासाठी पाठपुरावा करू. मात्र, येथे होणारा मेडिकल डिव्हाईस प्रकल्पही तिथेच होईल असेही ते म्हणाले.

मला म्हणाले, मी तीन पक्ष फिरून आलो. होय आलोय पण निवडणूक लढविण्यासाठी मी कोणत्याही दुसऱ्या आमदाराला घेऊन फिरलो नाही. पक्ष बदलला मात्र मी स्वबळावर निवडणूका लढविल्या. मी सचिन अहिरला घेऊन फिरलो नाही असे सांगत आदित्य ठाकरे यांनाही टोला लगावला. त्याचबरोबर मी राष्ट्रवादीला पवार साहेबांना सोडून शिवसेनेत आलो. ते तुम्हाला चाललं. त्यानंतर सुप्रिया सुळे, अजित पवार यांनी मला पाण्यात पाह्यला पाहिेजे. मात्र तुमच्यासोबत मी होतो तोपर्यत तुम्हाला चांगला वाटत होतो. आणि आता मी वाईट झालो का? असा खोचक सवालही त्यांनी केला.

Check Also

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *