Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवारांना उत्तर द्यायला वेळ नाही मला बरीच कामे आहेत नाना पटोले यांना अधूनमधून झटके येतात

बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावरून आणि शिंदे समर्थक आमदारांच्या वक्तव्यावरून चांगलीच टीका केली. तसेच वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरूनही शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, सध्या अजित पवार यांच्याकडे भरपूर वेळ आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर द्यायला लागलो, तर मला वेळ पुरणार नाही. मात्र त्यांच्याकडे भरपूर वेळ असल्याने ते सतत बोलत असतात पण मला उत्तर द्यायला वेळ नाही मला कामे भरपूर असल्याचे सांगत अजित पवार यांना गांभीर्याने घेत नसल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगून टाकले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.

राज्य सरकारमधील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारलेला नाही, असे कळते. परंतु जग कुठे चालले आहे आणि यांचा पितृपक्षामुळे कारभार अडला आहे अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली होती. यावर फडणवीसांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, अजित पवारांना खूप वेळ आहे, ते असे सगळे आरोप करत राहतील. त्याची उत्तर द्यायला मला थोडीच वेळ आहे, मला खूप कामं आहेत अशा शब्दात त्यांनी अजित पवारांना टोला लगावला.

भय आणि भ्रष्टाचाराच्या जोरावर भाजपा लोकशाही विकत घेत आहे आणि विकण्याची प्रक्रिया राबवत आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे. यावर फडणवीसांनी, नाना पटोलेंना असे झटके येत असतात. त्यामुळे ते असे काही काही बोलत असतात अशा शब्दात प्रतिक्रिया दिली.

तर, शिंदे -फडणवीस अस्तित्वात आल्यापासून प्रस्ताव स्थगिती सुरू आहेत आणि १३८ उद्योग एमआयडीसी मध्येच अडकले असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी, विरोधकांना कुठलीही माहिती नाही. कुठलीही माहिती न घेता ते बोलतात त्यामुळे ज्यांना माहिती नाही अशा विरोधकांच्या प्रश्नांना मी उत्तर देत नाही असे विधान केले.

जिथे गडबड आहे अशी कुठलीही चौकशी बंद होणार नाही. पण जिथे गडबड नाही पण जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या चौकशी केली असेल, तर अशा चौकशा केल्या जाणार नाहीत असे त्यांनी जलस्वराज्य चौकशीच्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.

याशिवाय बदल्यांच्या संदर्भात फडणवीस म्हणाले की, योग्य वेळी बदल्या होतील. मागील वेळच्या बदल्या या सप्टेंबरमध्ये झालेल्या आहेत. जे बदलीपात्र आहेत त्यांच्या बदल्या या सप्टेंबरनतरच होणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नांदेड येथे पोलीस भरतीची मागणी करत तरुणांकडून फडणवीसांसमोर घोषणाबाजी आणि धक्काबुकीचा प्रकार घडल्याचे समोर आला आहे. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागल्याचे प्रसारीत झालेल्या व्हिडिओत दिसून येत आहे. मात्र याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, कुठेही धक्काबुक्की, लाठीचार्ज झालेला नाही. पोलीस भरतीची मागणी ते करत होते. मी त्यांना जाऊन भेटलो आणि सांगितलं की, आम्ही करणार आहोत. त्यानंतर मी तिथून निघालो.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम, महाविकास आघा़डीला २६ मार्च पर्यंतची मुदत

आगामी लोकसभा निवडणूकीत काहीही करून भाजपाला केंद्रातील सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *