Breaking News

Tag Archives: ncp

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प, मात्र शरद पवारांचा इशाराः ४८ तास नाही, तर कर्नाटकात येतो महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केल्यानंतर शरद पवार यांनी दिला इशारा

मागील काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून सातत्याने महाराष्ट्रातील गावांवर दावा करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्राला चिथविणारी वक्तव्ये केली जात आहेत. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी आपला कर्नाटकचा दौरा रद्द केला. त्यातच आज बेळगावातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आला. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून …

Read More »

आंबेडकरांसोबतच्या बैठकीवर उध्दव ठाकरे म्हणाले, होय त्यांचे काही प्रश्न आहेत.. डिसेंबर अखेर वाटाघाटी पूर्ण करून महाआघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

आगामी पालिका आणि विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची बैठक पार पडली. या बैठकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृतरित्या काहीही जाहीर करण्यात आलेले नसले. तरी यासंदर्भात उध्दव ठाकरे यांना विचारण्यात आले असता त्यांनी आंबेडकर-ठाकरे यांच्या झालेल्या बैठकीला दुजोरा दिला. तसेच आघाडीबाबतची …

Read More »

अजित पवार म्हणाले, आमच्या अडीच वर्षाच्या काळात असे कधी झाले नव्हते सीमा भागातील अनेक गावे आताच का बोलायला लागली

राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. मात्र हे सरकारच आहे की नाही अशी अवस्था झाली आहे. या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात असलेली गावे कधीही बोलत नव्हती. मात्र आता ती गावे कोण म्हणतं गुजरातला जातो, कोण म्हणतं तेलंगणात जातो म्हणतो, तर कोणी थेट कर्नाटकात जातो असे म्हणतंय. आमच्या अडीच वर्षाच्या काळात …

Read More »

आशिष शेलार म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी सोबतचा संसार हाच सगळ्यात मोठा नेभळटपणा सामनाच्या अग्रलेखाला भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचे उत्तर

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जे अभिवादन करायला तयार नाहीत, अशा काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत तडजोडीचा संसार हाच सगळ्यात मोठा नेभळटपणा नाही का? …असे म्हणत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सामनातील अग्रलेखाला प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, विरोधी पक्षाने नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करायला हवा, …

Read More »

प्रसाद लाड यांच्याकडून अखेर भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी

मागील काही दिवसांपासून शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या कधी मंत्र्याकडून तर कधी प्रवक्त्याकडून तर कधी आमदाराकडून अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. तसेच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे राज्यातील वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. त्यातच भाजपाचे आमदार प्रसाद …

Read More »

भाजपा आमदाराच्या त्या वक्तव्यावर संभाजीराजे संतापले, जमत नसेल तर फडणवीसांनी…

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यानंतर भाजपाचे केंद्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणाबाबत भलतेच वक्तव्य केले. त्यामुळे राजकिय वर्तुळात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. लाड यांनी केलेल्या विधानावर छत्रपती संभाजी राजे …

Read More »

मंगलप्रभात लोढांचा खुलासा, मी तर तुलना केली…

शिवतप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर गेले होते. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात भाषण करताना भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानाने आता आणखी एक नवा वाद उफाळण्याची चिन्हं दिसत आहेत. राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर …

Read More »

लोढांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, उचलली जीभ लावली टाळ्याला

काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी केल्यानंतर जो वाद निर्माण झाला. त्याची राळ खाली बसत नाही, तोच भाजपाचे राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या घटनेची तुलना थेट शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून …

Read More »

नवाब मलिक यांना दिलासा नाहीच

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर आज ३० नोव्हेंबर मुंबईतील सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. पण, न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या पीठासमोर मलिक …

Read More »

गद्दारीचा किडा, मंगलप्रभात लोढा…;

गद्दारीचा किडा मंगलप्रभात लोढा… पन्नास खोके एकदम ओके… छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात त्यांच्याच मलबार हिल विधानसभा मतदारसंघात जोरदार आंदोलन करण्यात आले. भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीशी केल्याने …

Read More »