Breaking News

Tag Archives: ncp

निर्भया निधीतील वाहने सरंक्षणासाठी; शिंदे टोळीतील आमदारांना नक्की कशाची भीती वाटते ? निर्भया निधीतील वाहने पोलीस स्टेशन्सला तात्काळ पाठविण्यात यावीत-जयंत पाटील यांची मागणी

निर्भया निधी महिलांची सुरक्षितता आणि महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने तयार केलेला निधी होता. मात्र या निधीतून घेतल्या गेलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे. त्यामुळे ही वाहने तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी …

Read More »

अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत साधला चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा निधी काय कुणाच्या बापाचा आहे का? तो निधी सरकारचा आहे

मुंबईतील विकास कामांच्या शुमारंभावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना तीन वर्षे निर्णय न घेता स्थगिती देण्यातच वाया गेल्याची टीका केली. तसेच आम्हाला दोनच वर्षे मिळाल्याने आम्हाला टेन्विटी टेन्विटी खेळावी लागत असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत उच्च तंत्रशिक्षण …

Read More »

शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, हा भ्याडपणा हिंमत असेल तर समोर या अजित पवार, सुषमा अंधारे, उध्दव ठाकरेंनी निंदा करावी

पैठण येथील कार्यक्रमात भाजपाचे नेते तथा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वचस्तरातून टीकेचा भडीमार होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून एका अज्ञात व्यक्तीने आज चिंचवड गावात चंद्रकांत पाटील यांच्यावर …

Read More »

खासदार डॉ अमोल कोल्हेंचा संसदेत माईक बंद करण्यावरून राष्ट्रवादीचा हल्लाबोल जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून टीकेची झोड

महाराष्ट्रातील सगळ्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत जे काही आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीच बोलत आहेत असा प्रकार महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे त्याच्या तारखा लागतील पण हे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीतच ते भाजपचेच …

Read More »

अमित शाह यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्याची नोंद घेतील असा विश्वास कर्नाटक आणि राज्यपालांच्या विरोधात तक्रारी केल्या

मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे अवमानकारक वक्तव्य केले. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करण्यास सुरुवात करत उचकाविण्याचाही प्रयत्न केला. या सर्व प्रश्नी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, म्हणून मुख्यमंत्री कोणताच बाणेदारपणा दाखवत नाहीत शिवसेनेचे नाहीतच ते भाजपाचेच मुख्यमंत्री...

राज्यात घडणाऱ्या सगळ्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत जे काही आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीच बोलत आहेत. असा प्रकार महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही असे स्पष्ट करतानाच सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे, त्याच्या तारखा लागतील पण हे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत आणि महाराष्ट्राचे …

Read More »

अजित पवारांचा पलटवार, त्या निर्णयाबाबत फडणवीस धांदात खोटं बोलतायत तो निर्णय महाविकास आघाडीने घेतलाच नाही

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार असताना १३ मार्च २०२०, ३ मार्च २०२१, २० मे २०२१, ९ डिसेंबर २०२१ ला एक शासन निर्णय काढला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारच्या काळात कर्नाटक बँकेत पगार काढण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला तो साफ चुकीचा आहे. कर्नाटक बँक निकषात बसत नव्हती. काल …

Read More »

शरद पवार यांचा आरोप, मराठी बाहुल्य कमी कसे होईल यासाठी योजनाबध्द प्रयत्न कानडीचा द्वेष आम्ही करणार नाही

सीमाप्रश्न हा फार जुना प्रश्न आहेत. यात महाराष्ट्राची जी मागणी आहे तिला जनतेचा आधार आहे. आपण अनेक निवडणुकीमध्ये हा निर्णय लोकांचा आहे हे देशासमोर सिद्ध करू शकलो. अनेकदा याठिकाणी मराठी भाषिकांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर तरीही काही होत नाही हे पाहिल्यानंतर लोक नाउमेद होतात. अशी परिस्थिती सध्या सीमा भागात झाली आहे. …

Read More »

गुजरातच्या निकालावर शरद पवार म्हणाले, हळूहळू बदल होतोय… म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही

गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल यामध्ये कोणाच्या मनात शंका नव्हती. सगळी देशाची सत्ता त्यासाठी वापरण्यात आली. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेण्यात आले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे येतील याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम गुजरातमध्ये एकतर्फी निकाल लागणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा एका …

Read More »

धारावीचे टेंडर विशिष्ट व्यक्तीला मिळाल्याने सीमावाद घडवून आणला का? शरद पवारांची भूमिका स्पष्ट अदानीला पुर्नविकासाचे टेंडरवरून साधला भाजपावर निशाणा

राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर अनेक दिवस चर्चेत नसलेला सीमावादाचा भाजपाच्या कर्नाटकातील मुद्दा अचानक पुढे आणला जात आहे. त्यातच या सीमावादाचा धारावी पुनर्विकास प्रकल्पाशी संबंध जोडला जात आहे. एका विशिष्ट व्यक्तीला हे टेंडर मिळावं आणि त्याला विरोध होऊ नये म्हणून हा वाद पुढे आणला …

Read More »