Breaking News

अमित शाह यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्याची नोंद घेतील असा विश्वास कर्नाटक आणि राज्यपालांच्या विरोधात तक्रारी केल्या

मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे अवमानकारक वक्तव्य केले. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करण्यास सुरुवात करत उचकाविण्याचाही प्रयत्न केला. या सर्व प्रश्नी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांना याभेटीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, या सर्व घडामोडींचा माहिती आम्ही अमित शाह यांना दिली त्याची त्यांनी नोंद घेतली आणि माझा विश्वास आहे की यातून ते काहीतरी मार्ग काढतील. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की गुजरातचा शपथविधी झाल्यानंतर ते काहीतरी मार्ग काढतील. त्यामुळे माझा विश्वास आहे की, याप्रकरणात लवकरात लवकर केंद्रचा हस्तक्षेप होईल.

याशिवाय, आमचा विश्वास आहे की देशाचे गृहमंत्री पक्षपात करणार नाहीत आणि राज्याच्या व देशाच्या हिताचं जे असेल, तसा निर्णय ते घेतील. अशी आमची एक त्यांच्याकडून प्रांजळ अपेक्षा आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यात काय होतं हे पाहूयात असेही त्या म्हणाल्या.
याचबरोबर,  हे दुर्दैवी आहे की जेव्हा जेव्हा कुठल्याही वरिष्ठ नेत्याला आपल्याला भेटायची संधी मिळते, तेव्हा ज्या राज्यातून आपण तेव्हा तिथले प्रश्न मांडण्याची खूप मोठी संधी असते. त्यामुळे हे दुर्दैवं आहे की पंतप्रधानांना भेटायची जेव्हा संधी मिळाली, तेव्हा राज्याच्यावतीने कोणीच जर काही मांडलं नसेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

एक गोष्ट सातत्याने मी बघते आहे की, सत्तेत असलेले म्हणजे हिवाळी अधिवेशन सुरू होऊन तीन दिवस झालेले आहेत. पण मला कोणीही सत्तेत असलेल्या लोकांनी या कुठल्याही विषयाबद्दल बोललेलं माझ्यातरी कानावर आलेलं नाही. हे दुर्दैवं आहे की जेव्हा महाराष्ट्राचा विषय असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असेल याबद्दल अतिशय असंवेदनशीलपणे महाराष्ट्र सरकार हे ईडी सरकार वागतं आहे असल्याचा आरोपही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *