Breaking News

Tag Archives: ncp

प्रश्नोत्तराच्या पहिल्याच तासात आणि पहिल्याच प्रश्नावर शिंदे सरकारच्या मंत्र्याची दांडी गुल अजित पवार यांच्या पहिल्याच प्रश्नाला उत्तर न देता आल्याने प्रश्न राखून ठेवण्याची पाळी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात केलल्या प्रश्नांच्या भडीमाराची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता न आल्याने, शिंदे सरकारच्या कारकिर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली. आता या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून सोमवारी दिले जाणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, …

Read More »

भास्कर जाधव म्हणाले, सोमय्याचा स्टॉक संपल्याने… मोहित कंबोजच्या ट्विटवरून साधला निशाणा

मंगळवारी विरोधकांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक बंडखोर आमदारांना फटकारत जाब विचारला. त्यामुळे आगामी काळात विरोधकांकडून विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक भारी पडतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच काल रात्री उशीरापासून भाजपा पदाधिकारी मोहित कंबोज यांनी अजित पवारांना उद्देशून सूचक …

Read More »

अजित पवार यांनी बंडखोरांना फटकारल्यानंतर मोहित कंबोज यांचे सूचक ट्विट सिंचन घोटाळ्यातील सहभागावरून निशाणा

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विरोधकांची पत्रकार परिषद विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सर्व पक्षिय विरोधकांची झाली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी कडक भाषेत शिंदे गटाच्या आमदारांना फटकारत चांगलाच जाब विचारला. यापार्श्वभूमीवर काल रात्रीपासून भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी अजित पवारांना उद्देशून काही ट्विटस करत राष्ट्रवादी काँग्रेसचा …

Read More »

अजित पवार यांचा टोला, राज्यपालांनी कसे काम करावे याचा बोध राष्ट्रपतींकडून घ्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेच अजित पवारांच्या राज्यपालांना कानपिचक्या

देशाच्या दुसऱ्या महिला तसेच आदीवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मूर्मू यांचा उल्लेख करावा लागेल अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौप्रदी मूर्मू यांचा गौरव केला. तर त्या राज्यपाल असताना त्यांनी कसे काम केले याचा बोध विद्यमान राष्ट्रपती यांच्या कडून घ्यावा असा टोला अजित पवार …

Read More »

पावसाळी अधिवेशनः ५० खोके एकदम ओके…., आले रे आले गद्दार आले…. गगणभेदी घोषणांनी विधानभवन दणाणले

शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत स्थानापन्न झाल्यानंतर या सरकारचं हे पहिले पावसाळी अधिवेशन, पायउतार झालेले कालचे सत्ताधारी आणि आजचे विरोधक जोरदार हल्लाबोल करणार हे निश्चित होते. आज त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापुर्वी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून क्रिएटिव्ह अशी रचनात्मक घोषणाबाजी केली. ५० खोके… एकदम ओके… या सरकारचं …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवारांना त्रास होणार कारण…. शिदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचा त्रास होणार

उद्यापासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र त्यांनी त्यावर बहिष्कार टाकला. पण त्यांचे पत्र आम्हाला मिळाले. ते सात-आठ पानाचे आहे. ते पत्र बघताना मला वाटले तो अंतिम आठवडा प्रस्ताव आहे अशी कोपरखळी लगावत. त्यांनी लक्षात घ्यावं की आम्हाला सत्तेवर येवून …

Read More »

अजित पवार म्हणाले, मग आम्ही पण शक्तीमान असल्याचे दाखविण्यासाठी तसं… प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीच्या सवालावर अजित पवारांचे उत्तर

शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर राज्याचे पहिलेच विधिमंडळ अधिवेशन होत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर बैठकीत चर्चेची माहिती देण्यासाठी विधिमंडळ भवनात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले, एक आमदार कोणाचा कोथळा काढा, हात पाय तोडा अशी भाषा करत आहेत. एक बहाद्दर आमदार …

Read More »

अजित पवार यांनी सत्ताधारी आमदारांना दिला दम, सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि संतोष बांगर यांच्या कृत्यावरून दिला दम

काही दिवसांपूर्वी राज्यात शिंदे-फडणवीसचे सरकार सत्तेवर आले. मात्र या सरकारला अद्याप विधीची मान्यता मिळालेली नाही. विश्वासघाताच्या आणि अविश्वासाच्या बळावर हे सरकार उभे राहिले आहे. मात्र या सरकारच्या एका आमदाराकडून हात नाही मोडता आला तर तंगड तोडा असे त्यांच्या समर्थकांना सांगत आहे. तर आणखी एका आमदाराने सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलला. यावरून …

Read More »

अजित पवार म्हणाले, आज महागाई, बेरोजगारीसारख्या गंभीर समस्या पण… स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात साजरा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी अजित पवार यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याचा हा दिवस ज्यांच्यामुळे दिसला, देशासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले, हौतात्म्य पत्करले त्या सर्वांना अजित पवार यांनी यावेळी अभिवादन केले. आज …

Read More »

खातेवाटपानंतर अमोल मिटकरी म्हणाले, शिंदे गटाच्या तोंडाला पाने पुसली महत्वाची खाती भाजपाकडे

विरोधकांच्या सततच्या टीकेमुळे अखेर शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर चार दिवस संपत आले तरी खातेवाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर खात्यांचे वाटप झाले. या खातेवाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. खाते वाटपानंतर ट्विट करत अमोल मिटकरी म्हणाले, भाजपाने …

Read More »