Breaking News

अजित पवार यांचा टोला, राज्यपालांनी कसे काम करावे याचा बोध राष्ट्रपतींकडून घ्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेच अजित पवारांच्या राज्यपालांना कानपिचक्या

देशाच्या दुसऱ्या महिला तसेच आदीवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मूर्मू यांचा उल्लेख करावा लागेल अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौप्रदी मूर्मू यांचा गौरव केला. तर त्या राज्यपाल असताना त्यांनी कसे काम केले याचा बोध विद्यमान राष्ट्रपती यांच्या कडून घ्यावा असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला.

आज विधानसभेत राष्टपती द्रौपदी मूर्मू यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला त्याला समर्थन करताना ते बोलत होते. ५ वर्षाचा कालखंड पुर्ण झाल्यावर त्यांना हटविण्यात आल्याचे सांगून त्यांनी पुढे सांगितले की, झारखंडच्या लोकप्रिय राज्यपाल म्हणून देखील ओळखलं जातं. झारखंडच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये त्यांच्याबद्दल आदर होता आणि तो आजही आहे.

नाव न घेता राज्यपाल कोशारी य़ांच्यावर टिका

आज देशाच्या अनेक राज्यात राज्यपालांबद्दल शंका, संशय यामुळे वाद निर्माण होत असतो. परंतु द्रौपद्री मुर्मू या राज्यपालाच्या कारकिर्दीत अशा वादांपासून कटाक्षाने दुर राहिलेल्या आहेत, असे सांगत त्यांनी महाराष्ट्रातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. त्याचबरोबर मुर्मू यांनी त्या काळात घेतलेल्या काही भूमिका चर्चेत राहिलेल्या आहेत. आधीच भाजपाचे झारखंडमधील रघुवर दास सरकार आणि आताचं झारखंड मुक्तीचे हेमंत सोरेन सरकार यामध्ये त्यांनी काही विधेयक विना विलंब परत पाठवल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

आदिवासी संदर्भात एक विधेयक त्यांनी राज्य सरकारला पुन्हा विचारांसाठी परत पाठवलं होतं. त्यावेळी सरकारला त्याचं उत्तर देता आलं नाही आणि परिणामी त्याचं कायद्याचं रूपांतर झालं नाही. त्यांच्या संघर्षावर एक नजर टाकली तर संघर्ष कसा असतो, आणि तो कसा करायचा असतो त्यातून आपल्याला शिकता येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *