Breaking News

देवेंद्र फडणवीस यांना बढती, पण केंद्रीय मंत्री गडकरींना वगळले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडून यादी जाहिर

महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत शिवसेनेतील बंडखोरांच्या मदतीने राज्यात भाजपाचे सरकार स्थापन केले. त्यामुळे एकाबाजूला केंद्रात देवेंद्र फडणवीस यांचे राजकिय वजन वाढलेले असल्याचे सांगण्यात येत असतानाच आता थेट फडणवीस यांचा भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीत समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या समितीतून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौव्हान यांना वगळण्यात आले आहे.

भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आल्यानंतर बावनकुळे यांच्या सत्काराचा कार्यक्रम नागपूरात आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस हे उद्या दिल्लीत गेले तर राज्यात बावनकुळे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी असल्याचे वक्तव्य केले.

या वक्तव्यास ४८ तासाचा अवधी लोटत नाही तोच नितीन गडकरी यांनी सुतोवाच केल्याप्रमाणे केंद्रीय निवडणूक समितीत गडकरी यांना बाजूला सारत महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लावण्यात आली आहे.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर असले तरी भविष्यकाळात त्यांच्यावर लवकर केंद्रीय मंत्रिमंडळात किंवा पक्षाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांमध्ये समावेश करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची निवड केंद्रीय पातळीवर व्हावी अशी इच्छा जशी भाजपाच्या कार्यकर्त्यांची आहे. तशीच इच्छा राज्यातील भाजपाच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधकांचीही आहे. जेणेकरून देवेंद्र फडणवीस हे जर दिल्लीत गेले तर त्यांच्या तुलनेचा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे भाजपाशी दोन हात करणे राजकिय विरोधकांनाही सोयीचे होणार आहे.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *