Breaking News

भास्कर जाधव म्हणाले, सोमय्याचा स्टॉक संपल्याने… मोहित कंबोजच्या ट्विटवरून साधला निशाणा

मंगळवारी विरोधकांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक बंडखोर आमदारांना फटकारत जाब विचारला. त्यामुळे आगामी काळात विरोधकांकडून विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक भारी पडतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच काल रात्री उशीरापासून भाजपा पदाधिकारी मोहित कंबोज यांनी अजित पवारांना उद्देशून सूचक ट्विट करायला सुरुवात केली.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मोहित कंबोज यांच्या ट्विटवरून भाजपावर निशाणा साधला.

भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचे ट्विट करत दावा केला. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोहित कंबोज यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, कंबोज यांच्या ट्वीटवर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. किरिट सोमय्या यांचा स्टॉक संपला असल्याने मोहीत कंबोज या नौटंकीबाज व्यक्तीला पुढे आणण्यात येत असल्याची खोचक टीका केली.

भाजपाचे नेता किरीट सोमैया हे मराठी लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावतात. मात्र, हे आरोप लावता लावला सोमैयांजवळचा स्टॉक आता संपला आहे. त्यामुळे नौटंकी करणाऱ्या मोहीत कंबोज या नव्या माणसाला पुढं आणण्यात आलं आहे. मात्र, जो अन्याय आणि ईडीच्या कारवाया आमच्यावर होत आहे, महाराष्ट्राची जनता हे सर्व बघत आहे आणि जनताच त्यांना उत्तर देईल असेही ते म्हणाले.

मोहित कंबोज यांनी मंगळवारी काही ट्वीट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे, असं दावा त्यांनी केला होता. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आणखी एक ट्वीट करत कंबोज यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, २०१९ मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा. अशी मागणी केली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *