Breaking News

अजित पवार म्हणाले, मग आम्ही पण शक्तीमान असल्याचे दाखविण्यासाठी तसं… प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीच्या सवालावर अजित पवारांचे उत्तर

शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर राज्याचे पहिलेच विधिमंडळ अधिवेशन होत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर बैठकीत चर्चेची माहिती देण्यासाठी विधिमंडळ भवनात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले, एक आमदार कोणाचा कोथळा काढा, हात पाय तोडा अशी भाषा करत आहेत. एक बहाद्दर आमदार तर थेट सरकारी कर्मचाऱ्यावरच हात उचलत आहे. त्यामुळे सत्ता आली म्हणजे मस्ती आली का तुम्हाला ? असा दम शिंदे समर्थक आमदारांना भरला.

त्यानंतर एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विरोधी पक्ष कमकुवत असल्याचे बोलले जात असल्याचा प्रश्न अजित पवार यांना केला. त्यावर अजित पवार म्हणाले, अरे काय बोलताय, इथे मी आहे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आहेत. इतके सगळे असताना तुम्हाला कमकुवत दिसतयं का? असा खोचक सवाल करत आता आम्ही पण शक्तीमान असल्याचे दाखविण्यासाठी त्या आमदारांसारखं करावं का असा उपरोधिक सवालही केला.

कोण जय महाराष्ट्र म्हणतं, कोण जय हिंद म्हणतं कोण जय हरी म्हणतं असे असताना आता मध्येच वंदे मातरम आणलं. बरं वंदे मातरमला आमचा विरोध असण्याचं कारण नाही. परंतु हे मध्येच का आणलं. बरं महागाई काही बोला, शेतकरी मदतीवर बोला हे राहिलं बाजूला, हे विषय बाजूला सारण्यासाठी या गोष्टी जाणीवपूर्वक आणलं जात असल्याचेही ते म्हणाले.

आमचं सरकार असताना १५ हजाराची मदत शेतकऱ्यांना दिली. कोरोना काळ असतानाही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली. आता यात काय लबाडी केली असा उलट सवालही त्यांनी यावेळी केला.

Check Also

उद्धव ठाकरे यांचा टोला, मुस्लिम लीगबद्दलची माहिती नरेंद्र मोदी यांना असेल….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम लीगशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहे. १९४२ साली जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *