Breaking News

अजित पवारांचा पलटवार, त्या निर्णयाबाबत फडणवीस धांदात खोटं बोलतायत तो निर्णय महाविकास आघाडीने घेतलाच नाही

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार असताना १३ मार्च २०२०, ३ मार्च २०२१, २० मे २०२१, ९ डिसेंबर २०२१ ला एक शासन निर्णय काढला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारच्या काळात कर्नाटक बँकेत पगार काढण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला तो साफ चुकीचा आहे. कर्नाटक बँक निकषात बसत नव्हती. काल जो जीआर काढला ती एका दिवसात फाईल मंजूर केली असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत तर तो निर्णय आघाडी सरकारच्या काळात झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगत असतील तर ते धांदात खोटं बोलत असतील असा पलटवारही त्यांनी केला.

१७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीकडून काढण्यात येणार असलेल्या मोर्चाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी उपस्थित होते.

शिंदे-फडणवीस सरकारने काल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कर्नाटक बँकेत जमा करण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. हा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यासंदर्भातील प्रश्न प्रसार माध्यमांनी उपस्थित केला. त्यास उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी अजित पवार म्हणाले की, कर्नाटक आपल्याबद्दल आगपाखड करण्याचं काम करतं. तुम्ही त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करताय. डिसेंबर २०२१ पर्यंत चांगल्या अवस्थेतील बँकेत पगार करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. पण, कर्नाटक बँकेला मंजुरी दिली नव्हती. देवेंद्र फडणवीस हे आज अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ऊर्जामंत्री आहेत, जलसंपदा मंत्री आहेत, बरेच काही मंत्री आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री असणारी व्यक्ती धादांत खोटं बोलत आहे. ७ डिसेंबर २०२२ चा जीआर आहे म्हणजे कुणी काढला आहे, असा प्रतिसवालही केला.

गुजरात विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकावणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मात्र हिमाचल प्रदेशातील सत्ता राखता आली नाही. येथे काँग्रेसकडून भाजपाला पराभव पत्करावा लागला. हिमाचलमधील या पराभवावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या मुद्द्यावरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष असलेल्या नेत्याचं राज्य त्यांना टिकवता येत नाही. जे.पी. नड्डा यांचं राज्य हिमाचल प्रदेश ते त्यांना टिकवता येत नाही ही त्यांची नामुष्की नाही का?, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अजित पवार बोलत होते. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आहेत. त्यांचे राज्य असलेल्या हिमाचल प्रदेशातील आपली सत्ता राखण्यात त्यांना अपयश आले आहे. हिमाचल प्रदेशात भाजपने गुजरातमध्ये यापूर्वीचं रेकॉर्ड मोडण्यासाठी ताकद लावली होती, असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या खासदारांनी त्यांच्या सहीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन दिलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एकीकडे शांततेचा शब्द टाकतात, दुसरीकडे काहीतरी बोलतात त्यातून भडका उडावा, असा प्रयत्न ते करतात. कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे लोक स्वत:चं राज्य असल्यासारखं वागतात. भाषावार प्रांतरचनेचं तत्व आपण स्वीकारलं आहे. बेळगाव, निपाणी, कारवार भागातील लोक आंदोलन करत आहेत. सुप्रीम कोर्टात हरीश साळवे यांची नियुक्ती करावी, अशी आमची मागणी आहे.
सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरु असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री वक्तव्य करतात त्यातून असा प्रकार घडतो. लोकसभा अध्यक्ष हे दोन राज्यांचं प्रकरण आहे, असं म्हणतात. पण, हा विषय केंद्राच्या हातात आहे. केंद्रात, राज्यात तिन्ही ठिकाणी सरकार असल्यानं याबाबत भूमिका घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र द्रोहीं विरोधात हल्लाबोल मोर्चा आयोजित करण्यात आला. जत, देगलूर, सुरगणा, बुलढाण्यातील जळगाव जामोदमधील गावं दुसऱ्या राज्यात जायचं आहे, असं म्हणत आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या काळात असं घडलं नव्हतं. आताचं हे सरकार गावकऱ्यांना निधी द्यायला कमी पडलं आहे, असं सांगतानाच खुशाल हे लोक म्हणतात कुणीतरी फूस लावली. कसली फूस लावली, असा सवाल त्यांनी केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *