Breaking News

Tag Archives: ncp

अजित पवार कडाडले, महाराष्ट्र असा – तसा वाटला का?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतेच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर हक्क सांगितल्यानंतर आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यावर हक्क सांगितल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बसवराज बोम्मई यांना चांगलेच सुनावले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? कर्नाटकच्या …

Read More »

अजित पवारांचा गौप्यस्फोट, राज्यपाल म्हणाले मुझे अभी नही रहना है

ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने महामहिम राज्यपाल महोदयांना विचारांमधील अंधार दूर होऊ दे त्यांच्या वक्तव्यामधील गोंधळ संपू दे… राज्याच्या राज्यपालांना सद्बुद्धी लाभू दे अशी प्रार्थना सगळ्यांच्या साक्षीने अजित पवार यांनी आज केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे काही वक्तव्य आपण सगळयांनी बघितले ते महाराष्ट्रातील, देशातील कुणालाही …

Read More »

अजित पवारांचा सवाल, ३६५ दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्या किती

गुजरात राज्यातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदाच भर पगारी सुट्टी दिल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्यांवरही भाष्य केले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मुळात ३६५ दिवसात जवळपास सर्वच प्रकारच्या पगारी, आजारी सुट्टया असतात त्या जवळपास पावणेदोनशे सुट्टया …

Read More »

अजित पवार म्हणाले, पीक विमा २ हजारांचा आणि खात्यात आले ७०-९० रूपये

या सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनात फार मोठी नाराजी आहे. या सरकारने जलसमाधी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ देता कामा नये. आम्ही सरकारमध्ये असताना आंदोलनाची भूमिका कुणी मांडली तर त्यांच्याशी चर्चा करत होतो, मात्र आताच्या सरकारला शेतकऱ्यांसोबत चर्चाच करायची नाही ही भूमिका लोकशाहीमध्ये, सरकारने ठेवणे हे अतिशय चुकीचे आहे असे विरोधी पक्षनेते अजित …

Read More »

जत तालुक्यातील गावांच्या प्रश्नावरून जयंत पाटील म्हणाले,भावनांचा गैरवापर नको

सीमा भागातील गावांची प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याने कर्नाटकातील मंडळी दिशाभूल करण्याचे काम करत आहे. आमच्या जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे. जत तालुक्यातील ६५ गावे ही दुष्काळी होती. म्हैसाळच्या जुन्या योजनेचे पाणी …

Read More »

भाजपा म्हणते, त्या एका वक्तव्यावरून राज्यपालांना कोंडीत पकडू नका

भारतीय जनता पार्टीचे १८ कोटी कोट्यवधी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन काम करतात व शिवरायांचे इतिहासातील महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची …

Read More »

राज्यपालांच्या “त्या” विधानावर अखेर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याची दखल घेत त्यांनी डि.लिट या पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवछत्रपतींची तुलना नितीन गडकरी यांच्याशी करत शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श असे वक्तव्य करत शिवाजी महाराजांचा अवमान …

Read More »

राज्यपालांच्या विरोधात राष्ट्रवादीचे राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या सततच्या वादग्रस्त विधानांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच महाराष्ट्रीयन जनतेच्या भावनाही दुखावल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहित राज्यपाल पदावरून हटवा किंवा त्यांची इतरत्र बदल करा अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

भाजपाचा प्रवक्ता म्हणतो, छत्रपती शिवाजीने पाच बार माफी मागी

भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा. सावरकर यांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याचे वक्तव्य केले. यावरून महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपाचे राजकिय नाट्य रंगले असतानाच दिल्लीतील एका वृत्तवाहिनीवरील चर्चे दरम्यान भाजपाच्या प्रवक्त्याने सावरकरांच्या माफीचे समर्थन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच वेळा औरंगजेब यांची माफी मागितल्याचा दावा केला. त्यामुळे एकच खळबळ माजली …

Read More »

रोहित पवारांचा टोला, तेव्हा गप्प असणारी मंडळी आता सावरकरप्रश्नी रणकंदन माजवतायत

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून आणि जाहिर केलेल्या पत्रामुळे भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीकेची झोड उठवित कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अवमान झाला. त्यावेळी गप्प असणारे आता सावरकर …

Read More »