Breaking News

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प, मात्र शरद पवारांचा इशाराः ४८ तास नाही, तर कर्नाटकात येतो महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केल्यानंतर शरद पवार यांनी दिला इशारा

मागील काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून सातत्याने महाराष्ट्रातील गावांवर दावा करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्राला चिथविणारी वक्तव्ये केली जात आहेत. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी आपला कर्नाटकचा दौरा रद्द केला. त्यातच आज बेळगावातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आला. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चकार शब्द काढला नाही. त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला ४८ तासाची मुदत देत जे काही सुरु असेल ते जर थांबले नाही तर कर्नाटकात येऊ असा थेट इशाराच दिला.

काल ५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील काही वाहनांवर बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’च्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही जणांची मला मेसेज केले आहेत. त्यात बेळगावची स्थिती अत्यंत गंभीर आहे. समितीच्या मुख्य कार्यकर्त्यांची चौकशी सुरु आहे. त्यांच्या कार्यालयासमोर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून येणाऱ्या गाड्यांची चौकशी आणि प्रत्येक रस्त्यांची नाकेबंदी करण्यात आली आहे. १९ डिसेंबरला कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन अधिवेशन होणार आहे. त्यामुळे मराठी भाषिकांवर दहशतीचं वातावरण तयार करण्यात येत आहे. यासाठी तुम्ही येऊन धीर द्यावा, असं एकीकरण समितीने मेसेज केल्याचे सांगितले.

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे. पुढील २४ तासांत परिस्थिती निवळली पाहिजे. नाहीतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यासाठी जबाबदारी राहतील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका जर घडत असेल, तर देशाच्या स्थैर्याला मोठा धक्का असेल. केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, अशी कानउघडणीही त्यांनी केली.

येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही, तर माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल. कर्नाटकाच्या सीमेवर हे घडत असेल तर लोकांचा उद्रेक होऊ शकतो. तो होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“राज्य-कर्नाटक सीमेच्या बाबतीत झालं, ते अत्यंत निषेधार्थ आहे. गेल्या काही आठवड्यांपासून हे प्रकरण सुरु आहे. सीमा भागाशी मी अनेक वर्षे संबंधित आहे. मला स्वत:ला लाठीहल्ल्याला तोंड द्यावे लागले,” असं शरद पवार यांनी सांगितलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती निवाळावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. पुढील २४ तासात परिस्थिती निवळली पाहिजे. अन्यथा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यासाठी जबाबदार रहातील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका जर घडत असेल, तर देशाच्या स्थैर्याला मोठा धक्का असेल. केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. उद्यापासून संसदीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्यातील खासदारांना सांगणार आहे, की संसदेत भूमिका मांडा. कोणी कायदा हातात घेतला, तर त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला घ्यावी लागेल,” असा इशारा शरद पवार यांनी दिला.

माझ्याकडे जी माहिती आली आहे ती अत्यंत चिंताजनक आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं की, बेळगावमधील स्थिती गंभीर असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनाची चौकशी केली जात आहे. निवेदन देण्यासाठी मज्जाव केला जात आहे, असेही त्यांनी सांगितलं.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *