Breaking News

Tag Archives: balasahebanchi shivsena

सुनिल तटकरे यांची माहिती, जागा वाटप शुक्रवार किंवा शनिवारी होईल

महायुतीच्या लोकसभा जागा वाटपाची बोलणी एक – दोन दिवसात पूर्ण होईल. ४८ जागांचे वाटप सन्मानपूर्वक शुक्रवार किंवा शनिवारी होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिली. तसेच सुनिल तटकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून संबंध चर्चा करणे व ४८ + उद्दीष्ट असल्याने आम्ही सर्वच …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे टीकास्त्र,… फॅमिली गॅदरींग झाल्यासारखी सभा होती

भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्या टप्प्यात पोहोचू शकले नसलेल्या राज्यातील जनतेची मते-भावना जाऊन घेण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा मणिपूर ते मुंबई असा काढण्यात आला. त्या यात्रेचा समारोप काल मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. यावेळी झालेल्या जाहिर सभेला इंडिया आघाडीतील सर्व राजकिय …

Read More »

आता आमशा पाडवी यांचाही ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात डेरे दाखल

नंदूरबार मधील शिवसेना वाढीच्या महत्वपूर्व योगदान राहिलेल्या आमशा पाडवी आणि जिल्ह्याच्या राजकारणात काहीसे दुर्लक्षित राहिलेले परंतु विधान परिषदेवर निवडूण आलेले आमशा पाडवी यांनी अखेर आज शिवसेना उबाठा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः उपस्थित होते. तसेच …

Read More »

सुनिल तटकरे यांचा दावा, जागावाटपाचा निर्णय सामंजस्याने- सामोपचाराने होईल

येत्या एक – दोन दिवसात तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते दिल्लीत बसून जागावाटपाचा निर्णय सामंजस्याने आणि सामोपचाराने करतील असे सांगतानाच तिन्ही पक्षाने महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा निर्धार केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. बुधवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजित पवार, …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले, मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश हा तर ट्रेलर…

काँग्रेसच्या नेत्यांकडून एकाबाजूला यात्रा काढण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस पक्षातील नेते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमच्यासोबत येत आहेत. मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश हा तर एक ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. मिलिंद देवरा यांना बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर संजय राऊत म्हणाले, …अखेर न्यायालयाला ठरवावं लागेल ठाकरे गटाची मागणी पाच सदस्यी घटनापीठाने फेटाळली

महाराष्ट्रासह देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण बनलेल्या शिंदे आणि ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर सलग तीन दिवस सुनावणी घेतली. या दरम्यान, नबाम रेबिया खटल्याचा संदर्भ देण्यात आला. तसेच पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने परिशिष्ट १० चा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. या साऱ्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण किचकट असल्याचे स्पष्ट करत ही याचिका ७ …

Read More »

सर्वोच्च न्यायालयः निर्णय कोणाच्या बाजूने? शिंदे गटाच्या की ठाकरे गटाच्या युक्तीवादानुसार सकाळी १०.३० वाजल्यापासून सुनावणी सुरू

मागील तीन दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीला नबाम रेबिया खटल्याचा निकाल लागू होणार की ठाकरे गटाने केलेल्या मागणीनुसार परिशिष्ट १० तील तरतूदीनुसार हे ४० आमदार अपात्र ठरणार याविषयी युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात आज दोन्ही गटाकडून पूर्ण करण्यात आला. या युक्तीवादावर सर्वोच्च न्यायालयाने अद्याप निकाल राखून …

Read More »

राज्यातील राजकिय पेचप्रसंगावर नबाम रेबिया की परिशिष्ट १०? विधिज्ञ म्हणाले, ते दोन्ही संदर्भ…. सर्वोच्च न्यायालय मात्र उद्या निर्णय देण्याची शक्यता

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथविण्यासाठी शिवसेनेत मोठी फूट पाडण्यात आली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची, विधिमंडळाच्या उपाध्यक्षांना कोणते अधिकार यासह सर्वच गोष्टींवर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून नबाम रेबिया आणि किहोतो खटल्यातील निर्णयाचा संदर्भ देण्यात येत आहे. मात्र या निकालानंतर संसदेत मंजूर करण्यात आलेल्या परिशिष्ट …

Read More »

न्यायालयाने निर्णय राखून ठेवताच संजय राऊत म्हणाले, अजूनही या देशात न्याय जिवंत आमचा न्यायालयावर विश्वास

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जणांनी बंड पुकारत शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरच दावा ठोकला. याप्रश्नी ज्या नबाम रेबिया या खटल्याचा संदर्भ देण्यात येतो त्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या ७ सदस्यीय खंडपीठा समोर झाली होती. मात्र आता परिशिष्ठ १० मधील सुधारणेनंतर या याचिकेची सुनावणीही …

Read More »

संजय राऊत यांच्या त्या टीकेला दिपक केसरकर यांचे प्रत्युत्तर, …तुमचे बाबा आहेत टेस्ट ट्युब बेबी या टीकेला दिले खोचक प्रत्युत्तर

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या शिवसेना आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावरून उध्दव ठाकरे आणि बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या न्यायालयीन लढाईबाबत बोलताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही शिंदे गटाला मिळणार असल्याचे भाकित केले. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत शिंदे गटाला …

Read More »