Breaking News

Tag Archives: karnataka cm basavraj bommai

शरद पवार यांचा आरोप, मराठी बाहुल्य कमी कसे होईल यासाठी योजनाबध्द प्रयत्न कानडीचा द्वेष आम्ही करणार नाही

सीमाप्रश्न हा फार जुना प्रश्न आहेत. यात महाराष्ट्राची जी मागणी आहे तिला जनतेचा आधार आहे. आपण अनेक निवडणुकीमध्ये हा निर्णय लोकांचा आहे हे देशासमोर सिद्ध करू शकलो. अनेकदा याठिकाणी मराठी भाषिकांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर तरीही काही होत नाही हे पाहिल्यानंतर लोक नाउमेद होतात. अशी परिस्थिती सध्या सीमा भागात झाली आहे. …

Read More »

बोम्मईंची तक्रार देवेंद्र फडणवीसांनी केली अमित शांहकडे, म्हणाले, विनाकारण… फोनवरून झालेल्या चर्चेनंतरही तोडगा न निघाल्याने फडणवीसांनी केली तक्रार

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावाद पेटला आहे. महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कर्नाटकमध्ये हल्ला करण्यात आला आहे. तर कर्नाटकच्या काही वाहनांवर महाराष्ट्रात काळं फासलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी पेटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. …

Read More »

बोम्मईंशी नेमकं कोण बोललं? उपमुख्यमंत्री फडणवीस की, मुख्यमंत्री शिंदे फडणवीस म्हणतात बोम्मईंशी मी बोललो, पण बोम्मई म्हणतात मुख्यमंत्री शिंदेंनी फोन केला

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अचानक उफाळून आला. त्याचबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला चिथविणारी वक्तव्ये आणि महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतल्याचे सातत्याने राज्यातील जनतेला पाह्यला मिळाले. तसेच कर्नाटकातील कन्नड राष्ट्र वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली. अखेर या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भूमिका मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प, मात्र शरद पवारांचा इशाराः ४८ तास नाही, तर कर्नाटकात येतो महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केल्यानंतर शरद पवार यांनी दिला इशारा

मागील काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून सातत्याने महाराष्ट्रातील गावांवर दावा करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्राला चिथविणारी वक्तव्ये केली जात आहेत. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी आपला कर्नाटकचा दौरा रद्द केला. त्यातच आज बेळगावातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आला. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून …

Read More »

सीमावाद चिघळलाः महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटकात दगडफेक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बोम्मईंना केला फोन

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत. तसेच उचकाविण्याचाही प्रयत्न करत आहेत. त्यातच महाराष्ट्राचे दोन मंत्री बेळगांवात जाणार असल्याचे जाहिर केल्यानंतर या मंत्र्यांनाच अटकाव करणारे आदेश कर्नाटक सरकारने जारी केले. या सगळ्या घडामोडीत महाराष्ट्राच्या वाहनांवर बेळगांव जवळील हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर कन्नड रक्षण …

Read More »

उध्दव ठाकरेंचा इशारा, राज्यपाल आणि नेभळट शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महामोर्चा १७ डिसेंबरला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान मोर्चा

मागील काही दिवसांपासून राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाच्या आमदार, पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या अवमानाच्या आणि कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या विरोधात करण्यात येत असलेल्या वक्तव्यावर एक चकार शब्दही न काढणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात १७ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा खोचक टोला, सीमाप्रश्नी मुख्यमंत्री शांत का?

दिवसेंदिवस कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करत असून आधी सीमावर्ती भागातील गावांवर दावा सांगितला. त्यानंतर सीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी येवू नये यासाठी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिले. तर दुसऱ्याबाजूला सोलापूरात कर्नाटक भवनची आवश्यकता नसताना सोलापूरात कर्नाटक भवन उभारणार असल्याची घोषणा करत सीमाप्रश्नी वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरु आहे. …

Read More »

क्षुल्लक घटना आहे म्हणणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री आता म्हणतात… आदर राखला गेला पाहिजे माझे नागरीकांना आवाहन आहे

मराठी ई-बातम्या टीम शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यास सुरुवात झाली. त्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना विचारणा केली असता त्यांनी ही क्षुल्लक घटना असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे आगीत आणखीनच तेल ओतले गेले. त्यामुळे या प्रकाराच्या निषेधार्थ बेळगावातील मराठी …

Read More »