Breaking News

उध्दव ठाकरे यांचा खोचक टोला, सीमाप्रश्नी मुख्यमंत्री शांत का?

दिवसेंदिवस कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करत असून आधी सीमावर्ती भागातील गावांवर दावा सांगितला. त्यानंतर सीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी येवू नये यासाठी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिले. तर दुसऱ्याबाजूला सोलापूरात कर्नाटक भवनची आवश्यकता नसताना सोलापूरात कर्नाटक भवन उभारणार असल्याची घोषणा करत सीमाप्रश्नी वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरु आहे. इतके होऊनही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अद्यापही शांतच आहेत.

यापार्श्वभूमीवर बोम्मई यांच्या विधानावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष करत म्हणाले, सीमावादाच्या मुद्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक होत असेल, तर आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीवरून आल्यानंतर शांत का? बेळगावच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत? बेळगाव महाराष्ट्रात यावं यासाठी नवस का केला जात नाही? अशी संतप्त सवाल शिंदे-फडणवीस सरकारला केला.

आज सेवालाल महाराजांचे वंशज अनिल राठोड यांच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला, यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
साधारणत: प्रत्येक राज्यात इतर राज्यांचे भवन असतात. मात्र, आपलं आणि कर्नाटकचं नातं काय आहे, हे अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला आलेलं नाही. महाराष्ट्रात ते ‘कर्नाटक भवन’ बांधत असतील, तर आजच मी वृत्तपत्रात वाचले की, महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एक शब्दही बोलले नाही, अशी विचारणाही त्यांनी केली.

आता कर्नाटकने आपल्या तलावांमध्ये पाणी सोडलं आहे आणि आपले सत्ताधारी सत्तेच्या पाण्याखाली गटांगळ्या खात आहेत. या नेभळटपणाविरुद्ध आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी बोलताना त्यांनी उदयनराजेंच्या राज्यपालांविरोधी भूमिकेसंदर्भातही उध्दव ठाकरे बोलताना म्हणाले की, उदयनराजेचं धन्यवाद मानतो. गेल्यावेळी सांगितलं होतं की, भाजपातील छत्रपती प्रेमी एकत्र यावेत. त्याबाबत सुरुवात झाली आहे. तसेच, महाराष्ट्रातील गद्दारीची तुलना छत्रपतींच्या आग्र्यातील सुटकेशी केली जाते. अजूनही ते मंत्री राहत असतील तर महाराष्ट्र काय आहे, हे दाखवण्याची वेळ आली आहे असेही ते म्हणाले.

Check Also

शाहु महाराजांची उमेदवारी जाहिर केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, आमचं…

आज सकाळपासून लोकसभा मतदारसंघांच्या वाटपावरून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागांचा तिढा सोडविण्यावरून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *