Breaking News

सीमावाद चिघळलाः महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटकात दगडफेक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बोम्मईंना केला फोन

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत. तसेच उचकाविण्याचाही प्रयत्न करत आहेत. त्यातच महाराष्ट्राचे दोन मंत्री बेळगांवात जाणार असल्याचे जाहिर केल्यानंतर या मंत्र्यांनाच अटकाव करणारे आदेश कर्नाटक सरकारने जारी केले. या सगळ्या घडामोडीत महाराष्ट्राच्या वाहनांवर बेळगांव जवळील हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करत तोडफोड करण्यात आल्याची घटना आज घडली. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत.

दरम्यान या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना थेट फोन करून या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दूरध्वनी केला आणि बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली आहे. यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

या घटनेनंतर विरोधी पक्ष अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी यावरून टीका करताना म्हटले आहे की, नपुंसक पद्धतीने राज्य चालवलं जातयं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद म्हणण्याचा हक्क भाजपाने कायमचा गमावला आहे. इतकं नपुंसकत्व ते सतत सिद्ध करत आहेत. दिल्लीचेही तख्त सोडाच, दिल्ली पुढेही गुडघे टेकतो महाराष्ट्र माझा अशी यांची अवस्था आहे अशी टीका केली.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *