मागील काही दिवसांपासून शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या कधी मंत्र्याकडून तर कधी प्रवक्त्याकडून तर कधी आमदाराकडून अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. तसेच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे राज्यातील वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे.
त्यातच भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनीही शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानाबद्दल चुकीचे वक्तव्य करत इतिहासच नव्याने मांडण्याचा प्रयत्न केला.
काल ३ नोव्हेंबर मुंबईत कोकण महोत्सव पार पडला. या महोत्सवात बोलताना प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असं म्हणाले होते. प्रसाद लाड यांचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीट केला. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या.
कोकण महोत्सवात बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, तर हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोकणात केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले. रायगडावर स्वराज्याची शपथ घेतली, असे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केले होते.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.@PrasadLadInd@BJP4Maharashtra pic.twitter.com/gU1P43QLFD
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 4, 2022
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसाद लाड यांना लक्ष्य करत भाजपावर टीका केली. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असा खोचक सल्ला राष्ट्रवादीने भाजपाला दिला.
राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच राजकिय पक्षांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून टीका केल्यानंतर अखेर प्रसाद लाड यांनी एक ट्विट करत दिलगिरी व्यक्त केली. या व्हिडिओमध्ये प्रसाद लाड म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करण्याचा प्रयत्न करते, त्याचा मी निषेध करतो. स्वराज्य कोकण भूमी या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट म्हटलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची स्थापना कोकणातून झाली. तर, शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं अनावधाने माझ्याकडून बोललं गेलं. मात्र, माझ्याबाजूला बसलेल्या संजय यादव यांनी चूक शिवनेरीवर जन्म झाला सुधारत सांगितलं. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा केला.
https://twitter.com/PrasadLadInd/status/1599295977210671104?s=20