Breaking News

Tag Archives: prasad lad

‘महायुती’ च्या पत्रकार परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांचा शरद पवारांवर आरोप

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न सातत्याने केले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे हे पवारांच्या जाळ्यात फसल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपावर ते खोटे-नाटे आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते …

Read More »

मुंबईतील म्हाडा इमारतीत राहणाऱ्या ५० हजार रहिवाशांना दिलासा

म्हाडाच्या ५६ वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील सन १९९८ ते २०२१ या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. यामुळे सुमारे ३८०.४१ कोटींचे वाढीव सेवा शुल्क माफ होणार असून या निर्णयामुळे मुंबईतील ५० हजार सदनिकाधारांना दिलासा मिळाला असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री अतुल सावे …

Read More »

अजित पवार यांनी उदघाटनवेळी आवाहन करताना म्हणाले, व्यायाम करा, डोळ्यांची काळजी घ्या…. राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. स्व. आमदार …

Read More »

संजय राऊत यांचा टोला, काही दिवसांनी मुख्यमंत्री खाकी पँट आणि काळी टोपी… मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या रेशीमबाग भेटीवरून केली टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक अर्थात आरएसएसचे सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलं. तसेच, आरएसएसचे दुसरे संघचालक माधवराव गोळवरकर यांच्या स्मृतींनाही मुख्यमंत्री शिंदेंनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. यानंतर एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

प्रसाद लाड यांच्याकडून अखेर भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी

मागील काही दिवसांपासून शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या कधी मंत्र्याकडून तर कधी प्रवक्त्याकडून तर कधी आमदाराकडून अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. तसेच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे राज्यातील वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. त्यातच भाजपाचे आमदार प्रसाद …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, नको ते वाद करत बसायचे एवढचं सध्या सुरूय

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या अवमानकारक वक्तव्यावरून भाजपाचे खासदार तथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट सोळावे वंशच उदयनराजे भोसले यांनी रायगडावर शिवसन्मानार्थ कार्यक्रम करत जर कोणी शिवाजी महाराजांचा अवमान केला तर असा सज्जड इशारा दिला. त्याच २४ तासांचा अवधी उलटत नाही तोच त्याच्यांच पक्षाचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद …

Read More »

संजय राऊत म्हणाले, शिवरायांच्या जन्माबाबत या उपटसुंभ लोकांना माहित आहे का?

कोकण महोत्सवात भाषण करताना भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचे वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसकडून जारी करण्यात आला. त्यावरून भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर सर्वचस्तरातून टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली. लाड यांच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विट करत चांगलाच …

Read More »

भाजपा आमदाराच्या त्या वक्तव्यावर संभाजीराजे संतापले, जमत नसेल तर फडणवीसांनी…

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यानंतर भाजपाचे केंद्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणाबाबत भलतेच वक्तव्य केले. त्यामुळे राजकिय वर्तुळात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. लाड यांनी केलेल्या विधानावर छत्रपती संभाजी राजे …

Read More »

प्रसाद लाड यांच्या आरोपावर सुभाष देसाई म्हणाले, खबरदार…

‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महाविकास आघाडीवर फोडत सुभाष देसाई उद्योजकांकडून टक्केवारी घेत होते असा गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपाला सुभाष देसाई …

Read More »

पंकजा मुंडेंना डावलत भाजपाकडून फडणवीसांच्या मर्जीतील “या” पाच जणांना संधी चार नवे तर एक जूना असे मिळून पाच जणांची यादी जाहिर

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहिर झाल्यानंतर भाजपाकडून सर्वप्रथम भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले. त्यामुळे राज्याच्या राजकारणातून सध्या बाजूला फेकल्या गेलेल्या पंकजा मुंडे यानिमित्ताने पुन्हा सक्रिय होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच पुन्हा त्यांचे तिकिट कापण्यात आले. तर त्यांच्या ऐवजी नवोदित भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा …

Read More »