Breaking News

राज ठाकरे म्हणाले, नको ते वाद करत बसायचे एवढचं सध्या सुरूय

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या अवमानकारक वक्तव्यावरून भाजपाचे खासदार तथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट सोळावे वंशच उदयनराजे भोसले यांनी रायगडावर शिवसन्मानार्थ कार्यक्रम करत जर कोणी शिवाजी महाराजांचा अवमान केला तर असा सज्जड इशारा दिला. त्याच २४ तासांचा अवधी उलटत नाही तोच त्याच्यांच पक्षाचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांनी चक्क शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याची माहिती देत रायगडावर बालपण गेल्याचा दावा केला. त्यावर उदयनराजे भोसले यांची अद्याप प्रतिक्रिया आली नाही.

सध्या कोकणच्या दौऱ्यावर असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांना यासंदर्भात आज रत्नागिरीत असताना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, शिवाजी महाराजांकडून काही घेऊ नका. जे महाराजांनी सांगितलं, जे महाराजांनी शिकवलं, त्या गोष्टी शिकायचं नाही. फक्त नको ते वाद करत बसायचे. एवढच सध्या सुरू आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया देत ते पुढे म्हणाले, बेरोजगारी, शिक्षण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष विचलीत करण्यासाठी नको ते विषय काढले जातात, असल्याचा आरोप केला.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, यंदा कोकण दौऱ्यात मला लोकांच्या देहबोलीमध्ये खूप फरक जाणवतो आहे. येत्या जानेवारीमध्ये कोकणात माझ्या दोन सभा आहेत. त्यापैकी एक कुडाळ आणि दुसरी रत्नागिरी किंवा चिपळूण येथे होईल, अशी माहितीही दिली.

कोकणातील रिफायनरी प्रकल्पांबाबत बोलताना ते म्हणाले, कोकणासारख्या निसर्गरम्य सारख्या भागात प्रकल्प होऊ नयेत, असं आजही वाटतं. मात्र, एकूणच सद्या महाराष्ट्राचा विचार करता, प्रकल्प बाहेर जाणे, राज्याला परवडणारे नाही. काही दिवसांपूर्वीच एक-दोन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. अशा स्थितीत प्रकल्पांना विरोध करणंही योग्य नसल्याची भूमिका मांडली.

लपून-छपून भुरटे कोकणात जमीन घ्यायला येतात. त्यावेळी येथील स्थानिकांनी खबरदारी घेतली पाहिजे. जेव्हा लोकं हजारो एकर जमीन विकत घेतात, तेव्हा कोणाला संयशसुद्धा येत नाही? तेव्हा आपल्या माहिती पडतं की इथे प्रकल्प येत आहेत. त्यानंतर केंद्राचा आणि राज्याचा प्रकल्प इथे आल्यानंतर आपल्या जमीनीचे भाव मिळाले नाही, असं म्हणतो. काही गोष्टींबाबत सर्वांनी जागृत राहणे गरजेचं आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, सीमावादाच्या मुद्द्यावरून बोलताना, हे सर्व जाणीवपूर्वक सुरू असून मुळ विषयांवरून तुमचे दुर्लक्ष व्हावे, या हेतूने सर्व वाद निर्माण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी हर हर महादेव चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना म्हणाले की, कोणीही उठावं आणि इतिहासावर बोलावं, असं होऊ नये. जे लेखक, निर्माते असे चित्रपट काढतात, त्यांच्याशी किमान एकदा बोलायला हवं. मात्र, तसं न करता केवळ विरोध करायचा याला अर्थ नाही. उद्या लोकं महाराजांवर चित्रपट काढणं बंद करतील असे भीतीही व्यक्त केली.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *