Breaking News

संजय राऊत यांचा टोला, काही दिवसांनी मुख्यमंत्री खाकी पँट आणि काळी टोपी… मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या रेशीमबाग भेटीवरून केली टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक अर्थात आरएसएसचे सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलं. तसेच, आरएसएसचे दुसरे संघचालक माधवराव गोळवरकर यांच्या स्मृतींनाही मुख्यमंत्री शिंदेंनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.

यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, हे एक प्रेरणास्थान आणि स्फूर्तीस्थान आहे. बालपणी संघाच्या शाखेत गेलो होतो. रेशीमाबागेत आल्यावर समाधान वाटलं. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही. शिवसेना आणि भाजपा एकत्र आहेत, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदेंनी दिले.

मुख्यमंत्री शिंदेंच्या रेशीमबागेतील भेटीवरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी खोचक टोला लगावला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, संघ विचारांचा रेशमी किडा त्यांच्या कानात आणि मनात पहिल्यापासून वळवळत आहे. रेशीमबागेत जाणं चुकीचं नाही आहे. आरएसएस ही हिंदुत्ववादी विचारांची संघटना आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र जात असतील तर आनंद आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री काही दिवसांनी सभागृहात खाकी पॅन्ट आणि काळी टोपी घालून येतील. कारण, आरएसएस ही राष्ट्रीय बाण्याची संघटना आहे. आम्ही त्यांच्यावर कधीही टीका केली नाही. पण, पक्षांतर झालं आहे, इतक्या लवकर रक्तांतर होईल, असं वाटलं नव्हतं, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *