Breaking News

अजित पवार यांचा एकनाथ शिंदेना चिमटा, “हळूच माझ्या कानात तरी सांगायचं ना” उध्दव ठाकरेंना सांगून आम्हीच तुम्हाला बसविलं असतं

शिवसेनेत झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर हे बंड कसे झाले? का झाले? यावरून तर्क वितर्क व्यक्त केले जात असताना नेमक्या याच गोष्टीचा धागा माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा काढत भाजपामधील अनेकांवर टोलेबाजी केल्याचे चित्र आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पाह्यला मिळाले. त्यामुळे अजित पवार यांच्या भाषणामुळे काही काळ गंभीर असलेले वातावरण काहीसे हलके झाले.

विधानसभेच्या अध्यक्ष पदावर राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदनपर प्रस्तावावरील चर्चेत बोलताना अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे तुम्ही थोडसं जरी माझ्या कानात बोलला असता अजित जरा उध्दव ठाकरेंना सांग अडीच वर्षे झालीत. अन आता अडिच वर्षे मला मुख्यमंत्री पद द्या तर मीच उध्दव ठाकरेंना बोलून आम्ही तुम्हाला केलं असतं अन् ही वेळच आली नसती असे सांगत आदित्य ठाकरे काय प्रॉब्लेम आला नसता ना असा प्रश्नही सभागृहात उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांना विचारून त्यांची सहमती घेतली.

त्यावरून सभागृहात एकच हशा उसळला. त्यानंतर अजित पवार यांनी भाजपाचे आमदार गिरिष महाजन यांची टोपी उडवित म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी भाजपाने पाठिंबा दिल्याचे जेव्हा एकलं तेव्हा तो सगळ्या महाराष्ट्रासाठी शॉक होता. मात्र या शॉकचा सगळ्यात मोठा झटका भाजपा मधल्यानांच बसला. अनेक जण तर अजूनही रडत आहेत. त्यातले गिरिष महाजन यांना तर डोक्यावर बांधायला दिलेला फेटा काढून सारखं डोळे पुसत असल्याचे अजित पवार यांनी प्रत्यक्ष कृती करूनच दाखविले. त्यावेळी तर सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.

तुमच्या पहिल्या रांगेवर जरी बघितले तर सगळे आमचेच दिसत आहेत. त्यामुळे तुमच्या निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांचे दु:ख वाटते. त्यामुळे तुम्हा बंडखोरांना दिपक केसरकर यांच्या रूपाने चांगलाच प्रवक्ता मिळालाय असा टोला लगवात म्हणाले चांगले प्रवक्ते बनल्याचे दिसून येत आहे. आमच्याकडे असताना शिकलेल्याचा चांगलाच उपयोग होतोय असे दिसतंय असा उपरोधिक टोलाही त्यांनी केसरकर यांना लगावला. त्यावेळी केसरकर यांनी आपले तोंडच बसल्या ठिकाणीहून बाजूला करत झाकून घेतले.

राहुल नार्वेकर हे ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या पक्ष नेतृत्वालाच आपले करून टाकतात. ते पूर्वी शिवसेनेत होते. तर तेथे त्यांनी आदित्य ठाकरे यांनाच आपलंस केले. त्यानंतर ते आमच्यात आले तर त्यांनी चक्क मलाच आपलंस करून टाकले. आता भाजापामध्ये गेलेत तर तेथे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच आपलंस केले. शिंदे साहेब तुम्हाला सांगतो तुम्हीही नार्वेकर यांना आपलंस करा नाहीतर तुमचं काही खरं नाही असा सूचक इशाराही दिला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *