Breaking News

आमदार गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ: आता गुन्हाही दाखल महिला आयोगापाठोपाठ पोलिस ठाण्यातही गुन्हा नोंद

भाजपाचे नवी मुंबईतील आमदार तथा येथील बडे प्रस्थ असलेल्या गणेश नाईक यांच्या विरोधात त्या महिलेस बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच या महिलेने महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
२०२१ मध्ये गणेश नाईक यांनी आपल्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप या महिलेने गणेश नाईक यांच्यावर केलेला आहे. मी गणेश नाईक यांच्यासोबत २७ वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहे आणि आम्हाला एक मुलगा देखील झालेला आहे, या मुलास त्याच्या वडिलांचं नाव दिलं जावं अशी मागणी मी त्यांच्याकडे केली होती. मात्र गणेश नाईक यांनी मला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप संबंधित महिलेने केला.
आता याच प्रकरणात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याशिवाय या महिलेकडून राज्य महिला आयोगाकडे देखील तक्रार करण्यात आलेली आहे. तर, या प्रकरणी गणेश नाईक यांनी स्वत:ची डीएनए चाचणी करून यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी केली.
माजी मंत्री व ऐरोली विधानसभेतील भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आलेत. सन १९९३ पासून गणेश नाईक यांनी एका महिलेला लग्नाचे आमिष देवून व जीवे मारण्याची धमकी देवून तिचे लैंगिक शोषण करीत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला असून यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दिली आहे. सदर महिलेच्या तक्रार अर्जानंतर राज्य महिला आयोगाने गणेश नाईक यांना नोटीसही बजावली होती.
गणेश नाईक हे यापूर्वी शिवसेनेत होते. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. राज्यातील आघाडी सरकारच्या काळात ते अनेक वर्षे मंत्री म्हणून काम केले आहे. मात्र २०१४ पासून ते भाजपामध्ये आहेत. तसेच नवी मुंबई महापालिकेवर त्यांच्याच ताब्यात होती.

Check Also

महाराष्ट्रातील या ११ पोलिसांना “केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्ट तपास पदक” “केंद्रीय गृहमंत्री तपासात उत्कृष्टता पदकां”ची घोषणा

सन २०२२ च्या “केंद्रीय गृहमंत्री तपासात उत्कृष्टता पदकां”ची घोषणा करण्यात आली. पदक विजेत्यांमध्ये  महाराष्ट्रातील ११ पोलीसांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सन २०२२ साठी उत्कृष्ट तपासासाठीचे “केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्टता …

Leave a Reply

Your email address will not be published.