Breaking News

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत गोळीबार केल्याची केल्याची घटना घडली. या गोळीबारात चार राऊंड झाडण्यात आल्या. तसेच हा गोळीबार सलमान खानसाठीच करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

त्यानंतर या घटनेची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने रविवारी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर ४ राऊंड फायर केल्या, या झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. अनमोलची एक कथित सोशल मीडिया पोस्टवर जो भारतात चर्चा सुरु झाली आहे. तसेच अनमोल बिश्नोई याने गोळीबार हा फक्त “ट्रेलर” आहे असा इशारा दिला.

अनमोल बिश्नोईने आपल्या फेसबुक पोस्टद्वारे म्हणाला की, “आम्हाला शांतता हवी आहे. दडपशाहीविरुद्धचा निर्णय जर युद्ध असेल, तर तसाच असू द्या. सलमान खान, आम्ही तुम्हाला फक्त ट्रेलर दाखवला आहे, जेणेकरून तुम्हाला आमची ताकद किती आहे हे समजेल आणि त्याची परीक्षा घेऊ नका. हा पहिला आणि शेवटचा आहे. यानंतर फक्त घराबाहेर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत आणि आमच्याकडे दोन कुत्री असून त्याची नावे दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील अशी आहेत, ज्यांना ज्यांना तुम्ही देव मानता, मला जास्त बोलण्याची सवय नाही असे आपल्या पोस्टद्वारे सलमान खान यास दिली.

रविवारी पहाटे मुंबईतील वांद्रे येथील सलमान खानच्या घराबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी चार राऊंड गोळ्या झाडल्या. गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर पहाटे ४.५१ च्या सुमारास घडलेल्या या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

बॉलिवूड अभिनेत्याच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक पथकांनी घटनास्थळी भेट दिली आणि खानच्या घराबाहेर गोळ्या झाडलेल्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

सूत्रांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या नेमबाजांचे हरियाणा आणि राजस्थानशी संबंध असू शकतात. “शूटरची व्यवस्था राजस्थानचा कुख्यात गुंड रोहित गोदारा, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या टोळीने केली असण्याची शक्यता व्यक्त केली.

गेल्या वर्षी मार्चमध्ये सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमक्यांमुळे बॉलिवूड अभिनेत्याला प्रशिक्षित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शस्त्रे पुरवली आहेत. सलमान खानला वैयक्तिक शस्त्र परवाना देखील प्रदान करण्यात आला आहे आणि तो त्याच्या सुरक्षिततेसाठी वैयक्तिक शस्त्र बाळगू शकतो.

दरम्यान गोळीबार घटनेचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले असून या दोन व्यक्ती दुचाकीवार स्वार होऊन आले होते. या दोघांनीही हेल्मेट घातलेले असल्याने या दोघांची ओळख पटली नाही. मात्र रात्री उशीरा एकाची ओळख पटली असून ज्याची ओळख पटली आहे तो गुरगांव येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *