Breaking News

उद्धव ठाकरे यांची घोषणा, कर आकारणीचा विचित्र प्रकार आम्ही थांबवू

मुंबई महानगरपालिका आणि सिडको कडून सध्या जी कर आकारणी केली जात आहे, ती विचित्र पध्दत आहे. या विचित्र पध्दतीमुळे दोनदा कर आकारणी करण्यात येत आहे. माझे वचन आहे की, आम्ही नक्की हा प्रकार थांबवू असे आश्वासन यावेळी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.

वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानी पनवेलमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. त्यावेळी आयोजित पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आपलं सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यानंतर दुहेरी कराच्या फटक्यातून आम्ही नागरिकांना सोडविल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासनही यावेळी दिले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या निवडणूकांचा काळ सुरु झाला असून निवडणूकीच्या निमित्ताने अशक्य न वाटणाऱ्या घोषणांही काहीजणांनाकडून करण्यात येते. तर कधी कधी समोरची गर्दी पाहुन भलत्याच आश्वासनांची घोषणा केली जाते. त्यामुले मुळचे विषय बाजूला पडतात आणि भलतेच विषयांची घोषणा करत मूळ गोष्टी बाजूला सारून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचेही यावेळी सांगितले.

 

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *