Breaking News

…ही किमया राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते नागरिकांनी भाजपारुपी रावणाची जातीयवादी व धर्मवादी लंका दहन करण्यासाठी प्रतिज्ञा केली पाहिजे- महेश तपासे

पुण्यातील हनुमान मंदिरात आरती आणि मुस्लिम समाजातील बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन ही किमया फक्त सर्वधर्मसमभाव या तत्त्वांवर निष्ठा ठेवणारी राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते ती भाजप करू शकत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात व देशामध्ये सांप्रदायिकतेचा नाग पुनश्च एकदा आपला फणा काढून असताना महाराष्ट्राच्या जनतेने सर्वधर्मसमभाव या तत्त्वावर निष्ठा ठेवून या विषारी धर्मवादी नागाचा फणा ठेचावा असे आवाहन करत काही लोक राज्यातील शांती बिघडवण्याचा व राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना त्यांच्या मनसुब्यामध्ये यशस्वी होऊ न देणे हे कर्तव्य पार पाडले पाहिजे असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र सदैव शाहू-फुले-आंबेडकर आणि पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवून प्रगती करणारे राज्य आहे. २०१९मध्ये महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर सातत्याने सरकार बदनाम करणे, सरकार पाडणे याचे मुहूर्त काढले गेले व राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले. परंतु हे सर्व कुटील डाव महाविकास आघाडीने परतवून लावले आणि पुनश्च एकदा महाराष्ट्र विकासाच्या मार्गाने मार्गक्रमण करू लागला असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने नागरिकांनी भाजपरुपी रावणाची जातीयवादी व धर्मवादी लंका दहन करण्यासाठी प्रतिज्ञा केली पाहिजे. महाराष्ट्र हे सामाजिक सलोख्याचा राज्य आहे आणि देशाला सर्वधर्मसमभाव या विचाराचा मंत्र भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

राज ठाकरे-अमित शाह भेट होणार का? फडणवीस यांनी दिले ‘हे’ संकेत आयत्या वेळी होवू शकते भेट

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published.