Breaking News

विशेष बातमी

आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढविली विभागाकडून मुदतवाढीची घोषणा

आरोग्य विभाग भरती

आरोग्य विभाग अंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्यासाठी २९ ऑगस्ट २०२३ पासून नोंदणी सुरू असून त्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर २०२३ होती. परंतु दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची नाराजीः विधानसभाध्यक्षांनी दोन आठवड्यात निर्णय घ्यावा शिवसेना अपात्रतेच्या निर्णयावर राहुल नार्वेकर यांना फटकारले

राज्यातील सत्तासंघर्षावरील आमदार अपात्रता आणि शिवसेना पक्ष नावासह चिन्ह या मुद्द्यावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काहीच कारवाई केली नसल्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावरील सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यात आमदार अपात्रतेच्याबाबत निर्णय घेऊन त्याबाबतची सगळी प्रक्रिया न्यायालयास सांगावी असे …

Read More »

नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनानंतरही महाराष्ट्राच्या सुपुत्राला विमान उद्योगाला जमिन मिळेना मेक इन इंडियासाठी परदेशी उद्योगांना जमिन देता मग महाराष्ट्राच्या सुपुत्राला कधी?

मागील काही वर्षात देशाच्या विकासासाठी आणि वायु दलाची ताकद वाढविण्यासाठी कधी अमेरिका तर कधी फ्रांस तर कधी जर्मनीकडून विमाने केंद्र सरकारकडून खरेदी केली जातात. त्यावर कोट्यावधी अब्जावधी रूपयांचा खर्च केला जातो. मात्र परदेशी दर्जाची पूर्णतः भारतीय असलेल्या एका विमान उत्पादन करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार …

Read More »

अंगणवाड्यापाठोपाठ आता राज्यातील शाळा दत्तक घेता येणार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील लहानमुलांसाठी चालविण्यात येत असलेल्या अंगणवाड्या खाजगी स्वंयसेवी संस्थाना दत्तक स्वरूपात देण्यात आल्यानंतर आता राज्यातील शासकीय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘दत्तक शाळा योजना’ राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेत रकमेच्या स्वरुपात देणगी देता अथवा स्वीकारता येणार नाही. कॉर्पोरेट ऑफिसेसना …

Read More »

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरासाठी कोणत्या कायद्याचा आधार ? प्रस्ताव तयार असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० दिवसांनी फाईलीवर सही केली

मागील काही वर्षांमध्ये देशातील अनेक स्थळांचे आणि ठिकाणांची नावे भाजपा सरकारांनी किंवा केंद्र सरकारने बदलल्याचे पाह्यले. पण शहर, शहरांतर्गत आणि जिल्ह्याची नावे बदलण्यासाठी कोणत्या कायद्याचा आधार घेतला जातो. परंतु शहराचे नामांतर करायचे असेल तर नियम वेगळे आहेत आणि जिल्ह्याचे नामांतर करायचे असेल तर त्याचे नियम वेगळे आहेत. त्यामुळे शहर आणि …

Read More »

संसदेतील मार्शल्सचा ड्रेस कोड बदलला, मोदी सरकारचा आणखी एक बदल सफारी जाऊन लष्करी साधर्म्य असलेला पोशाख निश्चित

भाजपाप्रणित नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून मागील काही वर्षांपासून दिल्लीतील कधी रस्त्याचे नाव बदल तर कधी पाठ्यपुस्तकातून प्रमाणित इतिहास बदल, तर कधी गुलामीचे प्रतिक म्हणून संसद बदल असे अतार्किक निर्णय घेण्याचा सपाटाचा लावला. त्यातच आज संसदेत मागील ७५ वर्षापासून असलेल्या मार्शल्स अर्थात सुरक्षा अधिकाऱ्यांचा ड्रेसकोड अर्थात पोषाख बदलत त्यांना …

Read More »

साताऱ्यातील पुसेसावळी येथे दंगल हिंसक जमावाने घरे पेटवली

पुसेसावळी येथील एका समाजमाध्यम समूहावर महापुरुषांच्या अनुषंगाने आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाला होता. हा मजकुर एका विशिष्ठ समुदायातील युवक प्रसारीत करत असल्याचा संशयावरून रात्री ९.३० च्या सुमारास बहुसंख्य समाजातील युवक पुसेसावळी बाजारात जमा झाले. या युवकांनी विशिष्ट समाजाची घरे, दुकाने, हातगाडे, वाहने लक्ष्य करत दगडफेक सुरू केली. याचदरम्यान हिंस्त्र जमावाने घरे, …

Read More »

नोव्हाक जोकोव्हिच ची दिग्गज मार्गारेट यांच्या विक्रमाशी बरोबरी २४ वं ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकलं!

यूएस ओपन २०२३चे स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचने अजिंक्य पद पटकावले आहे. जोकोविचने न्यूयॉर्कमधील मार्गारेट कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून २४ वे ग्रँडस्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावले. सर्बियन टेनिसपटूनोव्हाक जोकोव्हिचने अंतिम फेरीत डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून चौथ्यांदा यूएस ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. नोव्हाक जोकोव्हिचचे हे विक्रमी २४ …

Read More »

जी-२० बैठकीच्या पंतप्रधान मोदी यांच्या व्हिडीओ आणि पोस्टरवरून चर्चांना उधाण व्यक्ती केंद्रीत प्रचार आणि ब्राझीलच्या फस्ट लेडीने फोटोसेशन नकारावरून चर्चांना ऊत

जवळपास ४० वर्षानंतर भारताला अर्थात इंडियाला जी-२० चे फिरते अध्यक्ष पद मिळाले. पण या अध्यक्षपदाचा उपयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभेच्या निवडणूका नजेसमोर ठेवून केल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात रंगली असतानाच जपानच्या एका प्रसारमाध्यमाने त्याविषयीची एक बातमीच दिल्लीतून दिली. त्याशिवाय आज जी-२० च्या बैठकीस सुरुवात होताच ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतावेळी मोदींबरोबर …

Read More »

OneNationOneElection साठी समिती स्थापल्याचे भारत राजपत्र प्रसिध्द माजी राष्ट्रपती राम कोविंद प्रमुख यांच्या नेतृत्वात अमित शाह यांच्यासह अन्य मंत्र्यांचा समितीत समावेश

आगामी लोकसभा निवडणूकीला काही महिन्यांचा अवधी राहिलेला आहे. परंतु २०१४ च्या आधी भारतात संसदीय प्रणाली ऐवजी अध्यक्षीय प्रणाली लागू करावी यासाठी उच्चभ्रु वर्तुळात संवाद-सत्रे आयोजित करणाऱ्या भाजपाकडून अखेर one nation one election अर्थात एक देश एक निवडणूक प्रणाली लागू करण्याच्या उद्देशाने अखेर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली गृहमंत्री अमित …

Read More »