Breaking News

विशेष बातमी

आर्मी डेपो खाजगीकरणाच्या विरोधात लष्करी जवान करणार आंदोलन देशभरातील कार्यालये आणि संसदेसमोर ४ लाख जवानांचे धरणे

मुंबईः प्रतिनिधी एल्फीस्टन येथील रेल्वेच्या पादचारी पुलावरील झालेल्या दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरीकांचा बळी गेला. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर अविश्वास दाखवित आर्मीच्या जवानांना पाचारण करत तेथील पादचारी पुलाचे काम करून घेण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घेत त्याची अंमलबजावणीही केली. संरक्षण मंत्रालयाने रेल्वेच्या हाकेला ओ देत मदतीचा हात दिला. परंतु याच संरक्षण …

Read More »

समृध्दी महामार्गासाठी आता अंतिम अर्थ पुरवठादाराच्या होकाराची प्रतिक्षा दक्षिण कोरिया कंपनीकडून शेवटची पाहणी पूर्ण

samruddhi समृद्धी महामार्ग

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या समृध्दी महामार्गाच्या मागे असलेले वित्तीय शुल्क काष्ठ काही केल्या अद्यापही सुटायला तयार नाही. या प्रकल्पासाठी निधी उभारणीचे आव्हान मोठ्या प्रमाणावर असून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी या प्रकल्पास वित्तीय सहाय करण्यास दोन्ही वेळेस नकार दिल्याने दक्षिण कोरियाच्या आर्थिक मदतीची शेवटची आशा राज्य …

Read More »

पदावरून दूर केलेल्या मोपलवार यांची पुन्हा एमएसआरडीसीत नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाचे रजा मंजूर करत पुन्हा रूजू होण्याचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी शहरातील बोरिवली येथील भूखंड स्वस्तदरात विकण्यासंदर्भात आणि बांधकाम व्यावसायिक सतीश मांगले यास धमकाविल्याप्रकरणी एमएसआरडीसीच्या उपाध्यक्ष पदावरून दूर करण्यात आलेले राधेश्याम मोपलवार यांना पुन्हा सेवेत रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांना पदावरून दूर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला असताना त्या कालावधीची रजा गृहीत धरून त्यांना …

Read More »

कोकणातील रिफायनरीवरून शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना आव्हान मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलत असल्याचा शिवसेनेचा आरोप

नागपूर : प्रतिनिधी कोकणातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांच्या रिफायनरीच्या स्थापनेकरीता शिवसेनेचे केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी पुढाकार घेतल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यास २४ तासांचा अवधी उलटत नाही. तोच या रिफायनरीच्या प्रकल्पासाठी शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा खासदाराने पुढाकार घेतला नसून मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे धादांत खोटे असून त्याबाबतची …

Read More »

सरकार भाजपचे निर्देश मात्र शरद पवारांचे साखर कारखान्यांची वीज खरेदी करण्यासाठी पवारांचे सरकारला आदेश

मुंबई : गिरिराज सावंत राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी राज्य सरकारच्या अपांरपारीक ऊर्जा धोरणातंर्गत ऊसाच्या चिपाडापासून वीज निर्मिती सुरु केली. मात्र ही वीज खरेदी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्देश दिले असून या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार आणि वीज महामंडळाचे अधिकारी उपस्थित असल्याची माहीती …

Read More »

अंधेरीत एसआरए प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर एल अँड टी कंपनीवर प्रकल्पग्रस्तांचा आरोप

मुंबई : जयंत कारंजकर अंधेरी आरटीओ परिसरातील अण्णानगर शिवशक्ती, अंधेरी कासमनगर आणि विठ्ठल-रुक्मिणी या पुनर्वसन योजनेसाठी एल अँड. टी या कंपनीकडून चक्क पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाचा गैरवापर येत असल्याची माहिती पुढे आली आहे. विकासक निवडीसाठी होत असलेल्या निवडणूकीत याबाबत एल अँड टी या नामांकित कंपनीसह वादग्रस्त चमणकर …

Read More »

माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे आणि श्यामसुंदर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल गृहनिर्माण संस्थेस जादा टीडीआर आणि व्यावसायिक वापराची परवानगी दिल्याप्रकरणी एसीबीची कारवाई

मुंबई : गिरिराज सावंत ओशिवरा येथील एका गृहनिर्माण संस्थेस दिलेल्या निवासी भूखंडास वाणिज्यिक वापरासाठीची परवनागी देत जास्तीचा टीडीआर दिल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे आणि श्यामसुंदर शिंदे यांच्यावर  गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे हा गुन्हा दाखल करताना गृहनिर्माण विभाग किंवा राज्य सरकारची कोणतीही परवानगी एसीबीने …

Read More »