Breaking News

विशेष बातमी

ज्येष्ठ रंगकर्मींच्या मार्गदर्शनाने ‘बालरंगभूमी अभियान’ चळवळीची सुरुवात बालनाट्याच्या प्रयोगांना महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न करणार

मुंबई : प्रतिनिधी बालरंगभूमीचा विकास घडवून नाट्यरसिकांना बालनाट्याचा आनंद देतानाच बालवयातच कलाकार-तंत्रज्ञांची पिढी घडविण्याच्या उद्देशाने आज मुंबईमध्ये ‘बालरंगभूमी अभियान’ संघटनेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी वर्षाताई विनोद तावडे तसेच ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे, बालरंगभूमी अभियानाच्या अध्यक्षा कांचनताई सोनटक्के आणि नाट्यक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून या बालरंगभूमी अभियानाची सुरुवात करण्यात आली …

Read More »

सरकारशी चर्चा सकाळीच… मुंबईकरांना त्रास होवू नये म्हणून मोर्चा रात्रीतच आझाद मैदानावर पोहोचणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकरी, आदीवासी यासह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर किसान सभेने जरी मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाचा त्रास मुंबईच्या चाकरमान्यांना होवू नये यासाठी रात्री १२ नंतर सोमय्या मैदानावरून आझाद मैदानाकडे निघणार असून रात्रीत सरकारशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचे  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डॉ.अशोक ढवळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना विना …

Read More »

आणि शिवसेनेचे आदरातिथ्य मोर्चेकऱ्यांनी नाकारले पाणी स्विकारू पण इतर खाण्या-पिण्याच्या गोष्टी नाही

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर प्रश्नांवर किसान सभेने नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढला. शेतकऱ्यांच्या मोर्चा असल्याने शिवसेनेने पुढाकार घेत मोर्चेकऱ्यांचे स्वागत करत पिण्याच्या पाण्यासह खाण्या-पिण्याच्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या. मात्र शेतकऱ्यांच्या मोर्चाची दखल घेतलीत म्हणून तुमचे पाणी स्विकारू पण खाण्याच्या-पिण्याच्या गोष्टी स्विकारणार नसल्याचे सांगत शिवसेनेचे आदारातिथ्य नाकारल्याची माहिती …

Read More »

चैत्र चाहूल चे २०१८ चे पुरस्कार जाहिर लेखक दत्ता पाटील यांना रंगकर्मी तर ज्येष्ठ कला दिग्दर्शक अविनाश गोडबोलेंना ध्यास सन्मान

मुंबई : प्रतिनिधी चैत्र चाहूल तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या रंगकर्मी सन्मान आणि ध्यास सन्मान या दोन्ही पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा रंगकर्मी सन्मान २०१८ हा पुरस्कार तरुण लेखक दत्ता पाटील आणि ध्यास सन्मान २०१८ या पुरस्कारासाठी अविनाश गोडबोले यांची निवड करण्यात आली आहे. चैत्र चाहूल तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या …

Read More »

वीज चोरीच्या आदेशाबाबत औरंगाबाद पोलिस अनभिज्ञ गृहविभागाच्या आदेशाबाबत पोलिस आयुक्त आणि पोलिस अधिक्षकांना माहितीच नाही

औरंगाबाद : प्रतिनिधी वीज चोरी संदर्भात प्रथम खबरी अहवाल देण्याकरता औरंगाबाद जिल्ह्यातील ५पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील सिडको आणि छावणी तर ग्रामीण भागातील चिकलठाणा, गंगापूर आणि सिल्लोड या तालुक्यांचा समावेश आहे. हे आदेश गृृह विभागाने २८ फेब्रूवारीला जारी केले आहेत. याबाबत पोलिस आयुक्त यशस्वी यादव आणि पोलिस …

Read More »

जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात बदली चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : प्रतिनिधी जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांची थेट मुख्यमंत्री कार्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी आणि प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. डिग्गीकर यांच्यासाठी नवीन पद निर्माण करण्यात आले असून त्यांच्यावर विशेष प्रकल्पांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी चार सनदी …

Read More »

चला धावू या नवी मुंबईत नेत्रदान, अवयव दानाच्या जनजागृतीसाठी तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने साडेपाच कि.मी आणि अडीच कि.मी अंतराची मँरेथॉन होणार

मुंबई : प्रतिनिधी नेत्रदान आणि अवयवासंदर्भात जनजागृती वाढावी यासाठी तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाकडून नवी मुंबईत मँरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ४ मार्च २०१८ रोजी होणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. ही स्पर्धा तेरणा वैद्यकीय महाविद्यालयच्या आयआरआयएस-२०१८ अंतर्गत, आकांक्षा प्रस्तुत  आणि माध्यम प्रायोजक मराठी e-बातम्या यांच्या संयुक्त …

Read More »

घरांसाठी करार करणाऱ्या सरकारकडून दोन वर्षात एक वीटही नाही रचली २१० कोटी रूपयांपैकी फक्त ५ कोटींचा खर्च

मुंबई: प्रतिनिधी देशातील प्रत्येक नागरीकाला स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात घर मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली प्रत्येकाला घर देण्याची घोषणा ९ डिसेंबर २०१५ रोजी केली. मात्र या घरांच्या निर्मितीसाठी मागील दोन वर्षात दोन वेळा विविध बांधकाम व्यावसायिकांशी सामंज्यस करार करणाऱ्या राज्य सरकारने स्वत:च्या गृहनिर्माण क्षेत्रातील म्हाडा, सिडकोच्या माध्यमातून …

Read More »

यंदाचा विं.दा. पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर भाषा अभ्यासक अविनाश बिनीवाले, वरदा प्रकाशन आणि मराठी विज्ञान परिषदेलाही पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषे दिनानिमित्त राज्य सरकारकडून देण्यात येणारा यंदाचा विं.दा.करंदीकर पुरस्कार ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला. तर डॉ. अशोक केळकर पुरस्कार भाषा अभ्यासक अविनाश बिनीवाले, श्री.पु.भागवत प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशनाला  आणि भाषा संवर्धन पुरस्कार मराठी विज्ञान परिषदेला देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे …

Read More »

घोटाळाकार नीरव मोदीच्या औरंगाबादेतल्या शोरूमवर ईडीची धाड सकाळपर्यत कारवाई चालण्याची शक्यता

औरंगाबाद : जगदीश कस्तुरे पंजाब नँशनल बँकेत ११ हजार कोटी रूपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पळून जाणाऱ्या निरव मोदीच्या औरंगाबादेतील गीतांजली शोरूमवर आज ईडीने धाड टाकली. मोदीचे शोरूम प्रोझोन मॉल मधील गीतांजली कंपनीची रत्ने विकणार्‍या शोरुमवर धाड टाकण्यात आली असून ईडीचे सहाय्यक संचालक आणि काही जवाहिरांच्या पथकाने धाड टाकली असल्याचे समजते. …

Read More »