Breaking News

विशेष बातमी

अन्न व औषध प्रशासनाचा ढीसाळ काराभारामुळे जनतेचे जीवनमान धोक्यात भारताच्या महालेखा परिक्षकांचे अन्न व औषध प्रशासन विभागावर ताशेरे

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील रूग्णांच्या आरोग्यासाठी महत्वाच्या असलेल्या औषध विक्रेत्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण करणे आवश्यक होते. मात्र राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या औषध प्रशासनाकडून या औषध व्रिकेत्यांच्या परवान्यांचे नुतनीकरणच करण्यात आले नाही. त्यातच रूग्णांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या गोळ्या, इंजेक्शन, सिरप या औषधांची तपासणी न करताच त्याच्या विक्रीला परवानगी दिल्याबाबतचा मुद्दा उघडकीस आला …

Read More »

शेवटी एल्गार मोर्चा निघालाच ! जिजामाता उद्यानापासून मोर्चा निघाला आझाद मैदानाकडे

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी भिडेंना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आंबेडकरी बांधवांनी काढलेल्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र तरीही वेळीच माहिती पोहोचली नाही. त्यामुळे हजारो कार्यकर्त्ये जिजामाता उद्यानाजवळ पोहोचले आणि तेथूनच या दलित समाजाने मोर्चाला सुरुवात केली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आझाद मैदानाच्या दिशेने जाण्यास सुरुवात …

Read More »

भिडेच्या अटकेसाठी दलित, मराठा, मुस्लिम समाज आझाद मैदानावर हजारोंच्या उपस्थितीत एल्गार आंदोलनाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगांव येथील हल्ल्याप्रकरणातील सुत्रधार असलेल्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेला अटक करण्याच्या मागणीवरून पुकारण्यात आलेल्या एल्गार आंदोलनाला आझाद मैदानावर सुरुवात झाली. या आंदोलनात दलित समाजाबरोबरच मराठा, मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनीही सहभागी घेतला असून हजारोंच्या संख्येने आंदोलक आझाद मैदानावर जमा होत आहेत. या आंदोलनासाठी मुंबई शहर, उपनगराबरोबरच विदर्भातील …

Read More »

इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासाठी राज्य सरकारचा शब्दकोश भाषा संचालनालयाचा शासन शब्दकोश ॲप आता मोबाईल उपलब्ध

मुंबई : प्रतिनिधी शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा. रोजच्या व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ आणि मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ सहज उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत येणाऱ्या भाषा संचालनालयाने शासन शब्दकोश ॲप तयार केले आहे. शासन शब्दकोश भाग – एक असे या मोबाईल अ‍ॅपला नाव देण्यात आले असून, यात …

Read More »

मंत्रालयाच्या दारात आणखी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न ग्रामस्थांने अंगावर रॉकेल ओतून घेतले

मुंबई : प्रतिनिधी अन्यायाच्या विरोधात किंवा स्वत:चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात येवून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. मागील महिनाभरात हे सत्र थांबले असे वाटत असतानाच  लासलगावच्या गुलाब शिंगारी यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा  प्रयत्न केला. मात्र  पोलिसांनी प्रसंगाचे गंभीर्य ओळखून शिंगारी यांना ताब्यात घेतले. …

Read More »

हमारी युती बनी रहेगी शिवसेना मुख्य प्रतोदांचे भाजपच्या मुख्य प्रतोदांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत आज विभागीय अनुदानाच्या मागणीवर चर्चा करताना भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहीत यांनी मुंबईला अधिक निधी देण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनीही आपल्या भाषणात मुंबईच्या विविध प्रश्नांना स्पर्श केला. यावेळी सुनिल प्रभू यांनी राज पुरोहीत यांच्याकडे पहात कल हो ना हो हमारी युती …

Read More »

गुढी पाडव्यापासून प्लास्टीक, थर्माकॉलच्या वस्तूंवर बंदी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात संपूर्ण प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तुंवर रविवारी गुढी पाडव्याच्या दिवसापासून बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत केली. तसेच प्लास्टीक आणि थर्माकॉल पासून ताट, कँप्स, प्लेट्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, स्ट्रॉ, कटलरी, नॉन वोवन पॉलिप्रॉपीलेन बँग्ज, स्प्रेड शीट्स, प्लास्टीक पाऊच, पँकेजींग यासह …

Read More »

अपक्ष आमदारांची अवस्था ना धड बाईसारखी ना गड्या सारखी अहमदपूरचे अपक्ष आमदार विनायकराव पाटील यांनी मांडली खंत

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत सर्व अर्थसंकल्प असेल, अर्थसंकल्पित पुरवणी मागण्या असतील आणि इतर विषय असतील. त्यावर बोलायला अध्यक्ष महोदय तुम्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना वेळ वाटून देता. मात्र आम्हा अपक्ष आमदारांची अवस्था ना धड बाई ना धड गड्याची राहीली अशी खंत व्यक्त करत सभागृहात बोलण्यासाठी आम्हालाही वेळ द्या अशी …

Read More »

भिसे आणि बोंद्रे यांचा मंत्री लोणीकर आणि मंत्री तावडेंच्या उत्तरावर संताप ४५ दिवस आधी प्रश्न देवूनही उत्तरे चुकीचे देत असल्याचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मंत्री महोदय ज्या गावात योजना सुरु असल्याचे सांगत आहेत. त्या गावातील नदीच्यावरील विहीरीत पाणीच नाही. पाणी नसताना तेथे पाणी पुरवठ्याची योजना कशी सुरु असेल असा सवाल आमदार त्र्यंबकराव भिसे यांनी उपस्थित केली. तसेच मंत्री महोदय चुकीचे उत्तर देत असून चुकीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. …

Read More »

एक बोटे आत एक भिडे बाहेर मिलिंद एकबोटेला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अखेर अटक

पुणे : प्रतिनिधी भीमा- कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी अँट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात येवूनही या घटनेचे मास्टरमाईंड असलेल्या मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना अटक करण्यास राज्य सरकारकडून टाळाटाळ केली जात होती. अखेर जनक्षोभ आणि विरोधकांच्या रेट्यामुळे दोघांपैकी  मिलिंद एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अखेर अटक केली. तर संभाजी भिडेवर अद्याप कोणतीही …

Read More »