Breaking News

अपक्ष आमदारांची अवस्था ना धड बाईसारखी ना गड्या सारखी अहमदपूरचे अपक्ष आमदार विनायकराव पाटील यांनी मांडली खंत

मुंबई : प्रतिनिधी

विधानसभेत सर्व अर्थसंकल्प असेल, अर्थसंकल्पित पुरवणी मागण्या असतील आणि इतर विषय असतील. त्यावर बोलायला अध्यक्ष महोदय तुम्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना वेळ वाटून देता. मात्र आम्हा अपक्ष आमदारांची अवस्था ना धड बाई ना धड गड्याची राहीली अशी खंत व्यक्त करत सभागृहात बोलण्यासाठी आम्हालाही वेळ द्या अशी मागणी अहमदपूरचे आमदार विनायकराव पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना केली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर अर्थसंकल्पातील विभागवार अनुदान योजना प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात करताना तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सभागृह सदस्यांना वेळेचे वाटप केले.

त्यावेळी अपक्ष आमदार विनायकराव पाटील हे मध्येच उठून रहात अध्यक्ष महोदय सभागृहात चर्चा होतात. त्यासाठी तुमच्याकडून सत्ताधारी आणि विरोधकांना वेळेचे वाटप केले जाते. मात्र आम्ही अपक्ष आमदार असून सरकारला आम्ही पाठिंबा दिला आहे. तरीही आम्हाला बोलायची संधी आणि वेळ मिळत नसल्याने आमची अवस्था न घर का ना घाट का ? अशी झाली. तर एकाबाजूला आम्हाला ना धड बाई ना धड गडी राहील्यासारखे वाटतेय अशी खंत व्यक्त करत आम्हालाही बोलायला वेळ द्या अशी मागणी केली.

त्यावर तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी तुम्ही ही प्रस्तावावरील चर्चेत भाग घेण्यासाठी नाव द्या तुम्हालाही संधी मिळेल असे सांगितले.

मात्र विनायकराव पाटील यांच्या या खंत व्यक्त करण्याच्या पध्दतीवर विधानसभेत चांगलाच हशा उसळला.

Check Also

५ लोकसभा मतदारसंघातील १,४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *