Breaking News

Tag Archives: maharashtra budget session

अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच : ११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प ३ ते २५ मार्च या कालावधीत होणार अधिवेशन

मराठी ई-बातम्या टीम राज्य विधिमंडळाचे २८ फेब्रुवारी २०२२ पासून नागपूरात होणारे अर्थसंकल्पिय अधिवेशन आता ३ मार्चपासून सुरु होणार असून अधिवेशनाची सांगता २५ मार्चला होणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्चला सादर करण्याचा निर्णय आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पावसाळी अधिवेशनाची सांगता होताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

भाजपाच्या भूमिकेत बदलः हिरेनप्रकरणी वाझेंचा राजीनामा नव्हे तर बदली विधान परिषदेत गृहमंत्री देशमुख तर विधानसभेत अनिल परब यांची माहिती

मुंबई : विशेष प्रतिनिधी मनसुख हिरेन हत्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याच्या मागणीवरून त्यांच्यावर 201 अन्वये खाली गुन्हा दाखल करून अटक करावी आणि पदावरून तात्काळ निलंबित करावे या मागणीवरून विधानसभेत देवेंद्र फडणवीस तर विधान परिषदेत प्रविण दरेकर यांनी काल मंगळवारी मागणी लावून धरली. तसेच विधानसभेचे कामकाज …

Read More »

बंजारा समाजाच्या तांड्यांना मिळणार महसूली गावांचा दर्जा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बंजारा समाजाच्या तांड्यांना व वस्त्यांना महसुली गावांचा दर्जा देण्यासंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिली. या संदर्भात सदस्य राजेश राठोड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना थोरात बोलत होते. औरंगाबाद विभागात परभणी जिल्ह्यातील जिंतूर …

Read More »

अखेर भाजपाने निर्माण केली नवी सशक्त विरोधी पक्षाची प्रतिमा आव्हान महाविकास आघाडीसमोरील कि फक्त शिवसेनेसमोरील

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील पाच वर्षात राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार असताना राज्यात आणि केंद्रात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज क्षीण राहीला. त्यामुळे अनेकवेळा विरोधक कुठे आहेत? प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात स्व. ग.प्र. प्रधान, स्व.एस.एम.जोशी यांच्यासह स्व.गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ सारख्या विरोधी पक्षनेत्यांची आठवण काढली …

Read More »

“त्या” प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याच्या डावामागे केंद्राच काळंबेरं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आरोप

मुंबई प्रतिनिधी ॲटांलिया बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी करत आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच बोलत “यापूर्वीच हा तपास आपल्या गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिला आहे. या सगळ्या यंत्रणा कोणा एकट्याची मक्तेदारी नसतात. सरकार येतं तेव्हा यंत्रणा तीच …

Read More »

महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पातून सर्वांचीच निराशा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असून समाजाच्या सर्वच घटकांची निराशा झाल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीही भरीव तरतूद अर्थसंकल्पात केली नाही. या सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील दोन लाखापेक्षा कमी कर्ज असणारे …

Read More »

राज्यातील जनतेसाठी अर्थसंकल्पातून अजित पवार यांनी काय दिले? क्लिक करा संपूर्ण अर्थसंकल्प आपल्यासाठी

मुंबईः प्रतिनिधी अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील पहिला भाग खालील प्रमाणे त्यांच्याच भाषेत…. आज ८ मार्च. हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो, हे आपणा सर्वांना माहित आहे. त्या निमित्ताने मी सरुवातीलाच राज्यातील सर्व माता-भगिनींना, युवती-विद्यार्थींनीना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देतो…. शुभ …

Read More »

कोरोना चाचणी केली नसल्याने माजी मुख्यमंत्र्यांसह २५ जणांना प्रवेश नाकारला कॉंग्रेस आमदार अमिन पटेल यांनी उपस्थित केला मुद्दा

मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशन कालावधीत दोन वेळा कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य असताना काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह २५ आमदारांनी चाचणीच केली नसल्याने विधिमंडळात प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. जरी आमदारांनी चाचणी केली नसली तरी त्यांना विधिमंडळात प्रवेश द्यावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमिन पटेल …

Read More »

विधानसभेत पटोलेंंच्या सूचनेने फडणवीसांना झाली मदत महाविकास आघाडीलाच आणले अडचणीत

मुंबईः विशेष प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांच्या घराजवळ जीलेटीनच्या कांड्यानी भरलेली स्कॉरपीओ गाडी आढळली. त्या गाडीच्या मालकाचा आज मृतदेह मुंब्रा रेती बंदर येथे सकाळी आढळून आल्याने या प्रकरणातील गुढ वाढल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत याप्रकरणाचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्याची मागणी विधानसभेत केली. …

Read More »

अजित पवारांना पडला प्रश्न म्हणाले सुधीर भाऊंना झालेय काय ? सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर अजित दादांची मिश्कील सवाल

मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांकडून टोकाची भाषणे होवून सुध्दा एकमेकांच्या टोप्या उडविण्याबाबत जरा उत्साह कमीच जाणवत आहे. मात्र आज खोपरखळ्या आणि चिमटे काढण्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चक्क भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे टोपी उडविण्याची संधी साधली. विधानसभेत आज विरोधकांनी …

Read More »