Breaking News

मंत्रालयाच्या दारात आणखी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न ग्रामस्थांने अंगावर रॉकेल ओतून घेतले

मुंबई : प्रतिनिधी

अन्यायाच्या विरोधात किंवा स्वत:चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात येवून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. मागील महिनाभरात हे सत्र थांबले असे वाटत असतानाच  लासलगावच्या गुलाब शिंगारी यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा  प्रयत्न केला. मात्र  पोलिसांनी प्रसंगाचे गंभीर्य ओळखून शिंगारी यांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु होताना ही घटना घडल्याने याचे राजकिय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

आत्मदहनाचा प्रयत्न करणारा गुलाब शिंगारी हा मूळचा लासलगावचा आहे. स्थानिक पोलीस पाटील आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर अवैधरित्या कब्जा केल्याचा त्यांचा आरोप  आहे.  याबाबत न्याय मिळावा या मागणीसाठी ते मंत्रालयात हेलपाटे घालत होते. दरम्यान मंत्रालयातल्या सुरक्षा रक्षकांनी  दिलेल्या माहिती नुसार शिंगरी यांनी मंत्रालयात आज प्रवेशच केला नाही. आपल्या कामानिमित्त त्यांनी कोणत्याही कार्यालयात संपर्क साधला नाही. केवळ प्रवेशद्वाराजवळ त्यांनी सोबत आणलेल्या बाटलीतून अंगावर रॉकेल ओतून घेतल्याचे सांगितले. या संदर्भात अधिक तपास सुरू असल्याची माहिती मरिन लाईन्स पोलिस ठाण्यातील पोलिसांनी दिली.

Check Also

चोकलिंगम यांची माहिती, पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज, १५० कंपनी तैनात

महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *