Breaking News

इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासाठी राज्य सरकारचा शब्दकोश भाषा संचालनालयाचा शासन शब्दकोश ॲप आता मोबाईल उपलब्ध

मुंबई : प्रतिनिधी

शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा. रोजच्या व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ आणि मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ सहज उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत येणाऱ्या भाषा संचालनालयाने शासन शब्दकोश ॲप तयार केले आहे. शासन शब्दकोश भाग – एक असे या मोबाईल अ‍ॅपला नाव देण्यात आले असून, यात निवडक शब्दकोशातील ७२ हजार १७१ पर्यायी शब्दांचा समावेश आहे.

भाषा संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या शब्द कोशांपैकी शासन व्यवहार कोश, प्रशासन वाक्प्रयोग,

न्यायव्यवहार कोश व कार्यदर्शिका हे चार निवडक शब्दकोश पहिल्या टप्प्यात या भ्रमणध्वनी उपयोजकाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपयोजकाद्वारे शासन व्यवहारात व न्याय व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांना मराठीत अर्थ व पर्याय आणि मराठी शब्दांना इंग्रजीत अर्थ व पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. दिवसेंदिवस माहिती तंत्रज्ञानात होत असलेला बदल विचारात घेता, मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा या उद्देशाने भाषा संचालनालयाने, निवडक शब्दकोशांचा समावेश असलेला शासन शब्दकोश भाग-१ हा भ्रमणध्वनी उपयोजक (ॲप) तयार केला आहे.

केंद्र व राज्य शासनाचे अधिनियमही उपलब्ध

शासन शब्दकोश मोबाईल अ‍ॅपमध्ये राज्य व केंद्र शासनाचे अधिनियमसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सध्या ७५० शासकीय अधिनियम उपलब्ध आहेत. या अधिनियमाची पीडीएफ स्वरूपातील मराठी प्रत उपलब्ध आहे ती डाऊनलोड सुद्धा करता येऊ शकते.

राज्याच्या भाषा संचालनालयाने मे १९७३ मध्ये पहिला ‘शासन व्यवहार कोश’ प्रकाशित केला, आणि शासकीय व्यवहारात मराठीचा वापर रुजविण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर नवे शब्द, नव्या परिभाषांनी व्यवहारातील मराठी कितीतरी समृद्ध होत गेली. अनेक शासकीय शब्दांना या कोशाद्वारे नवे पर्यायी शब्द दिले जावेत, असा भाषा संचालनालयाचा प्रयत्न आहे.

 ॲप डाऊनलोड करण्यासाठी

  • या ॲपची रचना अत्यंत सोपी आहे. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी ॲड्रॉईड फोनची आवश्यकता आहे.
  • एकदा हे ॲप डाऊनलोड केले की इंटरनेटशिवाय कधीही, कुठेही आणि केव्हाही वापरता येणार आहे.

शब्दकोश ॲपची वैशिष्ट्ये

  • या ॲपमध्ये आपण आपल्या पसंतीचा शब्दकोश आणि त्यातील इंग्रजी-मराठी आणि मराठी-इंग्रजी असे शब्दांचे अर्थ सुलभपणे पाहू शकतो.
  • भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्ले स्टोअरवरुन https://play.google.com/store/ apps/details id=gov.maharashtra. shabdkoshapp या दुव्यावरून  (लिंक) मोफत स्वरूपात भ्रमणध्वनीमध्ये उतरवून (डाऊनलोड) करुन घेता येईल.

 

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *