Breaking News

मिशन शौर्य मधील आदिवासी विदयार्थ्याकडून एव्हरेस्टवर महाराष्ट्राचा झेंडा आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील सोनेरी क्षण

मुबंई : प्रतिनिधी

आकांक्षापुढे जिथे गगन ठेंगणे…या काव्य ओळींची आठवण यावी असे धाडस करण्यात आज चार आदिवासी विदयार्थी यशस्वी ठरले आहेत. जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणा-या माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आज मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे यशस्वी ठरले आहेत.

एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपुर , जिल्हा प्रशासन चंद्रपुर आणि आदिवासी विकास विभागाने आदिवासी विदयार्थ्यातील नैसर्गीक काटक व धाडसीपणाला साद घालत मिशन शौर्यची आखणी केली. प्रधान सचिव मनिषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा वेगळा उपक्रम पहिल्यांदाच विभागातर्फे राबविण्यात आला.

मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे, आकाश मडवी, आकाश अत्राम, शुभम पेंदोर, विकास सोयाम, इंदू कन्नाके, छाया आत्राम हे सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील बोरडा, देवडा जिवती ब्लॉक्स मधील आदिवासी कुटुंबांतील मुले-मुली आदिवासी विकास विभागाच्या वतीने  गेल्या महिन्यात मिशन शौर्यवर निघाले होते.

जुलै २०१७ पासुन या विदयार्थ्याचे  प्रशिक्षण सुरु झाले होते. दार्जिलींग ,लेह, लडाख या ठिकाणी या मुलांना प्रशिक्षकांकडुन गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यात आले. गेल्या महिन्यात ११ एप्रिल रोजी हे विदयार्थी  मुबंईवरुन काठमांडुला रवाना झाले होते. मोहिमेवर जाण्यापुर्वी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, राज्यपाल चे. विदयासागर राव यांच्यासह आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी या विदयार्थ्याना भेटुन प्रेरणात्मक शुभेच्छा दिल्या होत्या.  या मोहिमेच्या अंतिम टप्प्यासाठी त्यांच्याबरोबर सपोर्ट स्टाफ व व्यवस्थापकांबरोबरच १५ शेर्पा, एक high altitude तज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. या मोहीमेतील अन्य विकास सोयाम व इंदु कन्हाके हे ही लवकरच लक्ष्य गाठतील व अन्य विदयार्थ्याची चढाई सुरू असुन लवकरच तेही एव्हरेस्ट सर करतील .

आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण- मंत्री विष्णु सवरा

आदिवासी विकास विभागाच्या वतीने मिशन शौर्य या मोहिमेत भारताचा झेंडा एव्हरेस्टवर लावण्यात आदिवासी विदयार्थी विदयार्थीनी यशस्वी ठरले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण असल्याचे मंत्री विष्णु सवरा यांनी सांगितले. या चारही जणांचे अभिनंदन मंत्री महोदयांनी केले.

तर विभागातर्फे राबविण्यात आलेला हे पहिलेच धाडसी मिशन होते यामध्ये विदयार्थ्यानी मिळवलेले यश हे नक्कीच प्रेरणादायी आहे. भविष्यातही आदिवासी विदयार्थ्याच्या विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतील. मिशन शौर्य शी निगडीत प्रत्येकाचे हे यश असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

One comment

  1. यात मिशन मध्ये भाग घेण्यासाठी काय करावे सर मी पण आदिवासी च आहे माझा मो 9145623530

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *