Breaking News

विशेष बातमी

तैवानमध्ये २४ तासात तीनवेळा भूकंप जपानला त्सुनामीचा इशारा

तैवानमध्ये गेल्या २४ तासात तीन वेळा भूकंप आला आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तैवानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व भागातील तायतुंग काऊंटी भूकंपाचं मुख्य केंद्र आहे, शनिवारी याच भागात ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. …

Read More »

धक्कादायकः शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळाने मंजूरी न दिल्यानेच वेदांता-फॉक्सकॉन गुजरातला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी न दिल्यानेच प्रकल्प गेला

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले. या दोन मंत्र्यांचेच मंत्रिमंडळ राज्यात तब्बल ३९ दिवस अस्तित्वात होते. या काळात अनेक महाविकास आघाडीच्या काळात रखडलेले निर्णय शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात राज्य मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आले. त्यातीलच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पांना देण्यात येणाऱ्या सबसिडी आणि सवलतींचा प्रस्ताव दोनदा पाठविण्यात …

Read More »

CM, Dy CM गणेश दर्शन, खाजगी व्यक्तींच्या नियुक्त्यातून जरा इकडेही लक्ष द्या उपजिल्हाधिकारी, जून्या मंत्र्यांकडील शासकिय अधिकारी अद्यापही पोस्टींगच्या प्रतिक्षेत

राज्यातील शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार जाऊन नवे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यास जवळपास दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होऊन तिसरा महिना सुरु झाला आहे. मात्र राज्याचे CM अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि Dy Cm अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या गणेश दर्शन यात्रा आणि खाजगी …

Read More »

शिंदे गटाला पडला प्रश्न, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी लोकं कुठून आणायची? उध्दव ठाकरे यांना तोडीस तोड द्यायचे कसे

मागील काही दिवसांपासून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेनेचे बंडखोर तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दावा करण्यात येत आहे. मात्र आता पर्यंत शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणून मुंबई, ठाण्यासह राज्यातून लोक न बोलविता या मेळाव्याला यायचे. पण आता मेळावा घ्यायचा तर लोकं आणायची कुठून असा …

Read More »

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय डॉक्टरांच्या निगराणीखाली प्रकृती अस्वस्थामुळे डॉक्टरांचा निर्णय

जगभरातील आदराचे स्थान मिळविलेल्या आणि अनेक घडामोडीनंतरही आपले राणी पद टिकवून ठेवलेल्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती बिघडली आहे. मात्र काळजी करण्याचे कारण नसले तरी त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बर्मिगहॅम पॅलेसच्यावतीने देण्यात आली आहे. मागील ऑक्टोंबर महिन्यापासून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती ठीक नाही. …

Read More »

ठाकरे विरूध्द शिंदेः घटनापीठाने सांगितलं, २७ सप्टेंबरला सांगणार काय करायचे ते निवडणूक आयोगाच्या सुनावणीबाबत देणार निर्णय

राज्यातील शिवसेनेतील फुटीमुळे खरी शिवसेना कोणाची यावरून निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायचा की नाही यासह सर्व याचिकांवरील निर्णय येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांनी सांगत सुनावणी तहकूब केली. निवडणूक चिन्हासंदर्भात …

Read More »

अखेर सरकारला फटकारत तीस्ता सेटलवाड यांना न्यायालयाकडून जामीन मग काय तुरुंगात ठेवावे का असा सर्वोच्च न्यायालयचा सवाल

गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न्यायालयाकडून क्लिन चीट मिळाली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या दंगलप्रकरणी काँग्रेसचे स्वर्गिय नेते अहमद पटेल यांच्याकडून पैसे घेवून तीस्ता सेटलवाड यांनी सरकार विरोधात कट कारस्थान रचल्याचा आरोप केला. त्यानंतर गुजरात एटीएसने तातडीने तीस्ता सेटलवाड यांच्या विरोधात गुन्हे दाखल करत मुंबईतून अटक केली. …

Read More »

भाजपा महिल्या नेत्याचा पराक्रम, घरात काम करणाऱ्या आदीवासी महिलेस शौचालय चाटायला… सीमा पात्रा ही झारखंडच्या भाजपा महिला पदाधिकारी आहेत

भाजपाने एकाबाजूला राजकारणाचा भाग म्हणून देशाच्या सर्वोच्च पदी आदीवासी महिला द्रौपदी मुर्मु यांना राष्ट्रपती बसविले आहे. तर दुसऱ्याबाजूला याच भाजपाच्या पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये आदीवासी बद्दल किती कणव आहे याचा पदार्फाश करणारी घटना नुकतीच उघडकीस आली. विशेष म्हणजे या भाजपाच्या महिला पदाधिकारी असलेल्या महिलेने आपल्याच घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कामात चूक …

Read More »

काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना मातृशोक इटलीत राहत्या घरी त्यांच्या आईचे निधन

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचं इटलीत निधन झालं आहे. २७ ऑगस्टला पाऊलो मायनो याचं निधन शनिवारी झालं आहे. त्यांच्यावरती मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट करुन माहिती दिली. सोनिया गांधी मागील आठवड्यात आपल्या आईंना भेटण्यास इटलीला गेल्या होत्या. त्यांच्यासमवेत राहुल …

Read More »

आंतरराष्ट्रीय जी – 20 देशाच्या बैठका महाराष्ट्रातील या शहरांमध्ये होणार सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे- मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सूचना

जी – 20 देशांच्या प्रतिनिधींची पुढील वर्षी मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथे परिषद होणार आहे. या परिषदेदरम्यान होणाऱ्या विविध बैठका आणि कार्यक्रम यांचे सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी आज येथे केल्या. या परिषदेच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव …

Read More »