Breaking News

भाजपा महिल्या नेत्याचा पराक्रम, घरात काम करणाऱ्या आदीवासी महिलेस शौचालय चाटायला… सीमा पात्रा ही झारखंडच्या भाजपा महिला पदाधिकारी आहेत

भाजपाने एकाबाजूला राजकारणाचा भाग म्हणून देशाच्या सर्वोच्च पदी आदीवासी महिला द्रौपदी मुर्मु यांना राष्ट्रपती बसविले आहे. तर दुसऱ्याबाजूला याच भाजपाच्या पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये आदीवासी बद्दल किती कणव आहे याचा पदार्फाश करणारी घटना नुकतीच उघडकीस आली. विशेष म्हणजे या भाजपाच्या महिला पदाधिकारी असलेल्या महिलेने आपल्याच घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कामात चूक झाल्यानंतर शौचालय चाटायला लावल्याची घृणास्पद घटना सदर मोलकरीण महिलेनेचे सांगितली आहे. त्याचबरोबर या महिला पदाधिकारीने सदर मोलकरणीला फारच निर्घुनपणे मारहाण करून जखमी केल्याची माहितीही पुढे आली आहे.

भाजपाच्या महिला पदाधिकारीचे नाव सीमा पात्रा असे असून ही आयएएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांची पत्नी आहे. मात्र हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अंगलट येवू नये म्हणून भाजपाने या सीमा पात्रा या महिलेची पक्षातून हकाल पट्टी केली.

आता यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पात्रा यांना अटक करण्यात आली आहे. भाजपा नेते आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी आज रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना पीडितेनं घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

आरोपी सीमा पात्रा या झारखंडच्या रहिवासी असून त्या माजी आयएएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. मागील आठ वर्षांपासून आरोपी सीमा पात्रा पीडित आदिवासी महिला सुनीता यांचा छळ करत होत्या. त्यांनी पीडित महिलेला आपल्या जीभेनं चाटून शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय पीडित महिलेच्या शरीरावर अनेक जखमाही आढळल्या आहेत. आरोपी सीमा पात्रा यांनी आपल्याला गरम वस्तूंने चटके दिल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. याबाबतचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

खुद्द आरोपी सीमा पात्रा यांचा मुलगा आयुष्मान यानंच पीडितेची त्यांच्या जाचातून सुटका केली आहे. त्यानं यासंदर्भात आपल्या एका मित्राला कल्पना दिल्यानंतर या मित्रानं पीडितेला वाचवण्यास आयुष्मानची मदत केली. यानंतर तक्रार दाखल झाल्यानंतर महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलिसांना पात्रा यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पात्रा यांना अटक करण्यात आली आहे.

या सर्व प्रकाराबाबत आदीवासी महिलेने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना घडला प्रकार सांगितला. तुम्ही जे जे काही ऐकलं आहे, ते सगळं खरं आहे. ते सगळं माझ्यासोबत घडलं आहे. घरात काम करताना माझ्याकडून जेव्हा चूक व्हायची, तेव्हा मॅडम मला मारहाण करायच्या, असं सुनीता यांनी सांगितलं आहे. सुनीता यांना सध्या रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

या सगळ्या प्रकाराविषयी बोलताना बाबूलाल मरांडी यांनी सीमा पात्रा यांच्यावर टीका केली आहे. आम्ही इथे पीडितेला भेटायला आलो होतो. ती एक गरीब महिला आहे. सीमा पात्रांच्या घरी घरकाम करायची. ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलं आहे, ते चुकीचं आहे. सीमा पात्रांना अटक झाली आणि त्यांना पक्षातून हाकलून लावलं हे बरंच झालं.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *