Breaking News

शिंदे गटाला पडला प्रश्न, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी लोकं कुठून आणायची? उध्दव ठाकरे यांना तोडीस तोड द्यायचे कसे

मागील काही दिवसांपासून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेनेचे बंडखोर तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दावा करण्यात येत आहे. मात्र आता पर्यंत शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणून मुंबई, ठाण्यासह राज्यातून लोक न बोलविता या मेळाव्याला यायचे. पण आता मेळावा घ्यायचा तर लोकं आणायची कुठून असा प्रश्न शिंदे गटाला पडला असल्याची माहिती शिंदे गटाला पडला असल्याची माहिती शिंदे समर्थक एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

वास्तविक पाहता शिवसेनेचा एक चाहता वर्ग आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जीवंत असल्यापासून शिवाजी पार्कवरील मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी राज्यातून लोक न बोलविता येत होते. त्यामुळे शिवाजी पार्कचे मैदान तुडुंब भरून जात आले आहे. मात्र यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे यांचे हिंदूत्ववादी विचार पुढे नेण्यासाठी म्हणून आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो. त्यामुळे खरी शिवसेना ही आमचीच आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवरील परंपरागत दसरा मेळावा हा आम्हीच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेतून बाहेर पडताना आमच्यासोबत ४० आमदार आले. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारीही आले. याशिवाय आजी-माजी नगरसेवकही आले. त्यामुळे हे सर्वजण दसरा मेळाव्याला जातीने हजरही राहतील. मात्र पूर्वी जशी लोकं स्वत:हून यायची तशी आता येतील की नाही? याबाबत आम्हाला शंका आहे. तसेच शिवाजी पार्कचे मैदान हे किमान ७ ते ८ लाख क्षमतेचे आहे. दरवर्षीप्रमाणे हे मैदान भरण्यासाठी किमान ५ लाख लोक तरी आले पाहिजेत असे आमचे गणित आहे. मात्र हे मैदान भरण्यासाठी इतकी सारी लोकं कोठून आणायची असा मुळ सवाल आमच्यासमोर सध्या तरी आमच्यासमोर असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमचीच शिवसेना खरी असल्याने शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा हा आम्हीच घेणार आहोत. सध्या तरी आमचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अद्याप जरी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली तरी ते लवकरच याबाबतची घोषणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्याच्या आमच्या राजकीय स्ट्रॅटेजीनुसार आम्ही याबाबत अधिकृत काही बोलणार नाही. मात्र दसरा मेळाव्यासाठी लोकं कुठून जमावयची हा प्रश्न आमच्यासमोर आहेच. परंतु दसऱ्याच्या एक-दोन दिवस आधीपर्यत आम्ही आमचे नियोजन कसे होणार ते बघणार आणि त्यानंतर आम्ही अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याबाबतचा अधिकृत निर्णय जाहीर करतील असे शिंदे गटातील अन्य एका आमदाराने सांगितले.

Check Also

देशातील तरूणाईच्या रोजगाराबाबत चिंताजनक स्थिती

भारतातील तरुणांच्या रोजगाराची सद्यस्थिती आणि दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अलीकडील अहवालात देशाच्या व्यापकपणे बोलल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *