Breaking News

विशेष बातमी

युक्रेनमध्ये अडकून पडलेला विद्यार्थी सांगतोय, मोदी सरकारची ती अफवा भारत सरकारचा आमच्याशी संपर्कच झालेला नाही

रशियाकडून युक्रेनवर हल्ला करण्यात येणार असल्याचा अंदाज असतानाही काहीही न करणाऱ्या भारत सरकारकडून कोणतीही हालचाल केली नाही. रशियाकडून प्रत्यक्ष हल्ल्याला सुरुवात झाली. त्यानंतर युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केलेल्या भारत सरकारकडून तेथील अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क साधल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात भारत सरकारचा असा कोणताही संपर्क …

Read More »

रशियाच्या हल्ल्यात कर्नाटकच्या विद्यार्थ्याचा मृत्यू खारकीव्ह मध्ये करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यात झाली दुर्घटना

मागील सहा दिवसापासून रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. मात्र युक्रेनला रस्त्यावरून महत्वाच्या शहरांकडे सरकणाऱ्या रशियन सैन्याला रोखण्यात काही प्रमाणात यश आलेले असले तरी रॉकेट हल्ला, मिसाईल हल्ला किंवा विमानातून बॉम्बहल्ला रोखण्यात युक्रेनला आणखी म्हणावे तसे यश आलेले नाही. यापार्श्वभूमीवर खारकीव्ह मधील एका इमारतीवर आज रशियाने रॉकेट हल्ला केला. …

Read More »

युक्रेनला एलोन मस्कची अशीही मदत इंटरनेट सुविधा शाबूत राखण्यासाठी सॅटेलाईटची दिली थेट मदत

मागील तीन चार दिवसांपासून युक्रेनवर रशियाने लष्करी कारवाई सुरु करत युक्रेनला बेचिराख करण्याचे काम रशियाकडून सुरु आहे. रशिया करत असलेल्या हल्ल्याने युक्रेनमधील इंटरनेट सुविधा आणि त्याचा डाटा सुरक्षिततेच्यादृष्टीने असलेल्या गोष्टीही उध्दवस्त होत आहेत. यापार्श्वभूमीवर एलोन मस्कने शक्तिशाली रशियाच्या विरोधात पाऊल उचलत युक्रेनला आपल्या कंपनीच्या स्पेसएक्स कंपनीने स्टारलिंक ही आपली अत्याधुनिक …

Read More »

युक्रेनच्या अध्यक्षांनी साधला रशियन जनतेशी हृदयसंवाद: वाचा काय नेमके म्हणाले भक्ती बिसुरे कानोलकर (Bhakti Bisure Kanolkar) यांनी भाषणाचा केलेला भावानुवाद

रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या कठीण प्रसंगी युक्रेनच्या अध्यक्षांनी रशियन नागरिकांशी आणि जगाशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. एक संवेदनशील, समंजस नेतृत्व कसे असते आणि अशा संकट प्रसंगी त्याचा कस कसा लागतो, ते अशा वेळी दिसून येते. आपण प्रत्येकाने हे भाषण वाचले पाहिजे. जग तिसऱ्या महायुध्दाच्या खाईत लोटायचे नसेल तर …

Read More »

रशियाच्या विरोधात २८ देश करणार युक्रेनला मदत : दिर्घकाळ युध्द चालण्याचा फ्रान्सचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघातील देशांचा निर्धार सर्व पध्दतीने करणार मदत

रशियाने युक्रेनवर केलेल्या चढाईचा आजचा तिसरा असून सकाळपासून युक्रेनची राजधानी कीवमध्ये बॉम्बहल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजत होते. त्यामुळे नागरीकांनी सुरक्षित स्थळी रहावे असा इशाराही या सायरनमधून देण्यात येत होता. तर दुसऱ्याबाजूला संयुक्त राष्ट्रसंघाती २८ सदस्य देशांनी रशियाच्या विरोधात रणशिंग पुकारले असून युक्रेनला मदत करण्याचा निर्णय घेतला असून फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल …

Read More »

सैन्याने शस्त्र टाकल्यावरच रशिया बोलणार, पण युक्रेन म्हणते अटीशिवाय चर्चेची तयारी रशियाचे परराष्ट्र मंत्री लवरोव यांची माहिती

मागील दोन दिवसात युक्रेनवर लष्करी कारवाई करत राजधानी कीवपर्यंत रशियन सैन्य घुसले. त्यासाठी समुद्री, हवाई आणि जमिनीवरून या सैन्याचे युक्रेनमध्ये घुसखोरी केली. तसेच रशियन सैन्याने युक्रेनमधील अनेक इमारतींना लक्ष्य करत त्यावर तोफगोळे डागले. त्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले तर अनेक नागरीक जखमी झाले. यापार्श्वभूमीवर आंतराष्ट्रीय समुदायाकडूनही रशियावर दबाव वाढत असताना …

Read More »

रशियाच्या फौजा युक्रेनच्या राजधानीत, राष्ट्राध्यक्ष म्हणाले मी थांबणार… १ लाखा रशियन फौजा युक्रेनमध्ये

रशियाने युक्रेनवर सुरु केलेल्या लष्करी कारवाई आता गंभीर परिस्थितीत आली असून एकाबाजूला जी-१७ राष्ट्रांनी रशियावर कडक निर्बंध घातले असतानाही रशियाचे तब्बल लाख सैन्य युक्रेनची राजधानी असलेल्या कीवमध्ये पोहोचले आहे. मात्र युक्रेनच्या सैन्यानेही रशियन सैन्याशी चिवट झुंज देण्यास सुरुवात केली असून शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर …

Read More »

युक्रेनच्या चर्नोबेल अणु ऊर्जा प्रकल्पावर रशियाचा ताबा पंतप्रधान डेन्यस स्मॅहल यांची माहिती

मागील तीन दिवसांपासून युक्रेनच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास सुरुवात केलेल्या रशियाने आज युक्रेनच्या आतील भागात मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले करत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. तसेच महत्वाचा असलेल्या चर्नोबेल अणुऊर्जा प्रकल्पावरही रशियाने आज ताबा मिळविला असल्याची माहिती युक्रेनचे पंतप्रधान डेन्यस स्मॅहल (Denys Shmyhal) यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आज दिली. रशियाने दोन दिवसापूर्वी हल्ले …

Read More »

अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मविआचा प्रभाग पध्दतीचा कायदा राज्यघटनेला छेद देणारा “एक व्यक्ती-एक मत-एक मूल्य'' या संकल्पनेला बसतोय छेद

काही महिन्यापूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग पध्दती लागू करत सदस्य संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारने नवा कायदा आणत विधिमंडळाची मान्यता घेतली. त्यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नव्याने प्रभाग आणि वार्डांच्या सीमा नव्याने निर्धारीत करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या या नव्या कायद्यामुळे राज्यघटनेतील “एक व्यक्ती-एक …

Read More »

आता १२ वीच्या वेळापत्रकात बदल: दोन विषयांचे पेपर मार्चऐवजी एप्रिल महिन्यात इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल २०२२ च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील ०५ मार्च आणि ०७ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे ०५ एप्रिल आणि ०७ एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री …

Read More »