Breaking News

युक्रेनला एलोन मस्कची अशीही मदत इंटरनेट सुविधा शाबूत राखण्यासाठी सॅटेलाईटची दिली थेट मदत

मागील तीन चार दिवसांपासून युक्रेनवर रशियाने लष्करी कारवाई सुरु करत युक्रेनला बेचिराख करण्याचे काम रशियाकडून सुरु आहे. रशिया करत असलेल्या हल्ल्याने युक्रेनमधील इंटरनेट सुविधा आणि त्याचा डाटा सुरक्षिततेच्यादृष्टीने असलेल्या गोष्टीही उध्दवस्त होत आहेत. यापार्श्वभूमीवर एलोन मस्कने शक्तिशाली रशियाच्या विरोधात पाऊल उचलत युक्रेनला आपल्या कंपनीच्या स्पेसएक्स कंपनीने स्टारलिंक ही आपली अत्याधुनिक ब्रॉडबँड सेवा युक्रेनमध्ये सुरू केली.

युक्रेनच्या डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्र्यांनी एलोन मस्कला मदतीची विनंती केली होती. त्यानंतर आता एलोन मस्क यांनी मोठा निर्णय घेत युक्रेनला मदतीचा हात दिला आहे. मस्क यांनी स्पेसएक्स कंपनीने स्टारलिंक ही आपली अत्याधुनिक ब्रॉडबँड सेवा युक्रेनमध्ये सुरू केली.

एलोन मस्क यांनी स्वतः युक्रेनच्या डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्र्यांच्या ट्वीटला प्रतिसाद देत युक्रेनमध्ये स्टारलिंक सेवा सुरू केल्याची माहिती दिली. युक्रेनच्या मंत्र्यांनी मदतीची मागणी केल्यानंतर १० तासात एलोन मस्क यांनी युक्रेनमध्ये ही सेवा सुरू झाल्याचे कळवले.

युक्रेनचे डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री म्हणाले, तुम्ही मंगळ ग्रहावर वसाहत तयार करण्याचा प्रयत्न करत असताना इथे रशिया युक्रेनवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचे रॉकेट यशस्वीपण अंतराळात स्थिरावत असताना रशिया युक्रेनच्या नागरिकांवर हल्ला करत आहे. आम्ही युक्रेनला तुमच्या स्टारलिंक स्टेशनची सेवा देण्याची विनंती करतो.

रशियाने युक्रेनला नमवण्यासाठी केवळ जमिनीवरील नुसती सैन्य कारवाई केलेली नाही, तर युक्रेनची डिजीटल यंत्रणा उद्ध्वस्त करून चारही बाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न केला. याचाच भाग म्हणून रशियाकडून युक्रेनच्या इंटरनेट सेवा आणि ब्रॉडबँड सेवा देणाऱ्या यंत्रणा देखील उद्ध्वस्त केल्या जात आहेत. त्यामुळे युक्रेनचा उर्वरित जगाशी संपर्कच तुटून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर युक्रेनच्या मंत्र्यांनी थेट एलोन मस्क यांना मदतीची विनवणी केली होती.

स्टारलिंक स्पेसएक्सच्या २,००० हून अधिक उपग्रहांच्या समुहाचं संचालन करणारे अंतराळातील स्टेशन आहे. संपूर्ण पृथ्वीवर इंटरनेट सेवा पुरवणे हा या स्टेशनचा उद्देश आहे.

 

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *