Breaking News

रशियाच्या विरोधात २८ देश करणार युक्रेनला मदत : दिर्घकाळ युध्द चालण्याचा फ्रान्सचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघातील देशांचा निर्धार सर्व पध्दतीने करणार मदत

रशियाने युक्रेनवर केलेल्या चढाईचा आजचा तिसरा असून सकाळपासून युक्रेनची राजधानी कीवमध्ये बॉम्बहल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजत होते. त्यामुळे नागरीकांनी सुरक्षित स्थळी रहावे असा इशाराही या सायरनमधून देण्यात येत होता. तर दुसऱ्याबाजूला संयुक्त राष्ट्रसंघाती २८ सदस्य देशांनी रशियाच्या विरोधात रणशिंग पुकारले असून युक्रेनला मदत करण्याचा निर्णय घेतला असून फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आता हे युध्द दिर्घकाळ चालेल असा इशारा रशियाला दिला.

मॅक्रॉन यांनी देशवासीयांना संबोधित करताना या युद्धावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

त्यामुळे आतापर्यत रशियाने केलेल्या हल्ल्याच्या सातत्याने येणारे वृत्त थांबून युक्रेनच्या चढाईचे वृत्तही आता बाहेर येवू लागेल अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत.

रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईमुळे सुरुवातीला फक्त दोन देशातील भांडण असे चित्र दिसू लागले होते. परंतु आता या लष्करी कारवाईवरून जगभरात दोन तट पडत असल्याचे दिसून येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या संरक्षण विषयक समितीत युएई, चीन आणि भारताने तटस्थ भूमिका स्विकारली. तर रशियाच्या बाजूने उर्वरीत देशांनी भूमिका घेतल्याने सुरक्षा मंडळात रशियाची सरशी झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. मात्र नाटो राष्ट्र संघटनेतील देशांनी रशियाने केलेल्या या हल्ल्याबाबत नाराजी जाहीर करत युक्रेनला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आगामी काळात युध्दाची तीव्रता वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

रशियाविरोधात आता युक्रेनच्या बाजूने जगातल्या इतर देशांनी एकजूट होताना पाहायला मिळत आहे. अमेरिकेनं देखील रशियाविरोधात युक्रेनला शस्त्रास्त्रांची आणि फौजांची मदत करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आता रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाला एक मोठं वळण मिळाले आहे.

जगभरातल्या इतर देशांना देखील त्यांनी सतर्क राहण्यास बजावले असून जगानं आता दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धासाठी तयार राहायला हवे. युक्रेनमधलं युद्ध आता बरंच वाढणार असल्याचा इशारा मॅक्रॉन यांनी देत रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात युक्रेनच्या बाजूने उतरण्याचा निर्धार केला आहे. यासाठी युक्रेनला शक्य ती सर्व मदत करण्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. जर आज मी तुम्हाला कुठली गोष्ट सांगू शकत असेल तर ती हीच आहे की हे युद्ध दीर्घकाळ चालणार. हा संग्राम दीर्घकाळ चालणार. या युद्धामुळे आणि त्याअनुषंगाने उद्भवणाऱ्या पेचप्रसंगांमुळे दूरगामी परिणाम होतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

रशियानं छेडलेल्या या कृतीला खंबीरपणे विरोध करू. हा विरोध संयमी, ठाम आणि एकत्रितपणे केला असेल असे सांगत ते पुढे म्हणाले की, सध्या घडत असलेल्या घडामोडी युरोप आणि फ्रान्सच्या इतिहासातला टर्निंग पॉइंट ठरतील. रशियाकडून युक्रेनवर करण्यात आलेला हल्ला हा त्यांनी आत्तापर्यंत दिलेल्या सर्व आश्वासनांच्या विरोधी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *