Breaking News

राज्यपालांच्या “त्या” मंजूरीने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ खटला चालविण्याच्या अर्जाला दिली परवानगी

काही दिवसांपूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांना शासकिय निधीचा अपहार केल्याप्रकरणी चांदूर बाझार सत्र न्यायालयाने त्यांना दोन महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुणावली. परंतु त्यांनी वरील न्यायालयात अपील करणार असल्याचे न्यायालयाने सांगितल्याने न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. परंतु वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडू यांनी शासकिय निधीचा अपहार केल्याची तक्रार राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे तक्रार करत खटला चालविण्यासंदर्भात परवानगी मागितली. त्यास राज्यपालांनी मंजूरी देत तसे आदेश पारीत केले. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

बच्चू कडू हे राज्य विधिमंडळाचे सदस्य आणि राज्य मंत्रिमंडळाचे घटक आहेत. त्यांच्या विरोधात एखादा खटला दाखल करायचा असेल किंवा पोलिसी कारवाई करायची असेल तर त्याची माहिती राज्यपाल आणि विधिमंडळाला देवून त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत बच्चू कडू यांच्या विरोधात खटला चालविण्यास परवानगी मागत त्या विषयीचा अर्ज दिला. त्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अर्जाला मंजूरी देत खटला चालविण्यास परवानगी दिली. त्याचबरोबर त्याचे आदेश अकोला पोलिस अधिक्षकांना दिले. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांचंही नाव समोर आले आहे. काही इतर जिल्हा मार्ग आणि ग्राम मार्ग हे शासन क्रमांक नसलेल्या रस्त्यांच्या कामाची यादी जिल्हा परिषदेला पाठवून बच्चू कडू यांनी सरकारी निधीचा अपहार केल्याचे समोर आले. याबाबतचे पुरावे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी समोर आणले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत राज्यपालांची भेट घेत योग्य कारवाईची मागणी केली होती.

दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. चांदूर बाजार प्रथमवर्ग न्यायालयाने ११ फेब्रुवारी रोजी हा निर्णय दिला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवली होती. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाचा आज निकाल आला असून बच्चू कडू यांना शिक्षा सुनावण्यात आली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *