Breaking News

रशियाच्या फौजा युक्रेनच्या राजधानीत, राष्ट्राध्यक्ष म्हणाले मी थांबणार… १ लाखा रशियन फौजा युक्रेनमध्ये

रशियाने युक्रेनवर सुरु केलेल्या लष्करी कारवाई आता गंभीर परिस्थितीत आली असून एकाबाजूला जी-१७ राष्ट्रांनी रशियावर कडक निर्बंध घातले असतानाही रशियाचे तब्बल लाख सैन्य युक्रेनची राजधानी असलेल्या कीवमध्ये पोहोचले आहे. मात्र युक्रेनच्या सैन्यानेही रशियन सैन्याशी चिवट झुंज देण्यास सुरुवात केली असून शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मी माझा देश सोडून कुठेही जाणार नसल्याचे सांगत मला माहित आहे ते माझ्यासाठीच येत असल्याचे. पण मी जाणार नाही असे स्पष्ट केले.

गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या राजधानीत घुसून तिथल्या सरकारला खाली खेचले. या आक्रमणावेळी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी पळ काढल्यामुळे त्याची मोठी चर्चा झाली होती. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती सध्या युक्रेनमध्ये दिसत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आपण कीवमध्येच थांबणार असून कुटुंबीय देखील कीवमध्येच आहेत, असे स्पष्ट केले.

वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जारी केलेल्या निवेदनामध्ये रशियाच्या हल्ल्यापुढे नमणार नसल्याचं सांगत शत्रूने (रशिया) मला त्यांचा नंबर वन टार्गेट केले आहे. माझे कुटुंब हे त्यांचे नंबर दोनचं टार्गेट आहे हेही मला माहिती आहे. त्यांना युक्रेनच्या राष्ट्रप्रमुखालाच लक्ष्य करून युक्रेनला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करायचं आहे. पण मी कुठेही पळून जाणार नाही. मी राजधानीतच राहणार आहे. माझं कुटुंब देखील युक्रेनमध्येच आहे असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हणाले.

गुरुवारी रशियाने जमिनीवरून, सागरी मार्गाने आणि हवाई मार्गाने युक्रेनवर हल्ला चढवला. तब्बल १ लाख सैन्याने युक्रेनमध्ये शिरून तिथल्या फौजांचा प्रतिकार मोडून काढायला सुरुवात केली. गेल्या दोन महिन्यांच्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर अखेर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले. आज युद्धाचा दुसरा दिवस असून रशियन फौजा थेट युक्रेनची राजधानी कीवमध्ये शिरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनकडून इतर देशांना मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे.

आत्तापर्यंत रशियावर इतर देशांनी घातलेले निर्बंध पुरेस नाहीत. त्यांनी अजून निर्बंध घालायला हवेत असे आवाहनही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी जगातील प्रमुख देशांना केले.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *