Breaking News

सैन्याने शस्त्र टाकल्यावरच रशिया बोलणार, पण युक्रेन म्हणते अटीशिवाय चर्चेची तयारी रशियाचे परराष्ट्र मंत्री लवरोव यांची माहिती

मागील दोन दिवसात युक्रेनवर लष्करी कारवाई करत राजधानी कीवपर्यंत रशियन सैन्य घुसले. त्यासाठी समुद्री, हवाई आणि जमिनीवरून या सैन्याचे युक्रेनमध्ये घुसखोरी केली. तसेच रशियन सैन्याने युक्रेनमधील अनेक इमारतींना लक्ष्य करत त्यावर तोफगोळे डागले. त्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले तर अनेक नागरीक जखमी झाले. यापार्श्वभूमीवर आंतराष्ट्रीय समुदायाकडूनही रशियावर दबाव वाढत असताना रशियाचे परराष्ट्र मंत्री सेरगई लवरोव यांनी युक्रेनच्या सैन्याने शस्त्र टाकल्यानंतरच त्यांच्याशी बोलणी करण्यास रशिया तयार असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे युक्रेन आणि रशियातील संघर्ष आणखी चिघळला आहे.

त्याचबरोबर नव-नाझीवाल्यांकडून युक्रेनवर सत्ता राबवायला नको असेही ते म्हणाले.

गुरूवारी युक्रेन विरोधात रशियाकडून लष्करी कारवाई करण्यात येत असल्याची घोषणा रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी केली होती. त्यानंतर दोनच दिवसात रशियन सैन्य युक्रेनच्या राजधानीत पोहोचले. तर कीवमधील एका शासकिय इमारतीवर रशियाचा झेंडा फडकाविल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यभ वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार मिखायलो पोडोलेक म्हणाले की, आम्हाला शांती हवी आहे. पण शस्त्र टाकून नव्हे तर आम्हीही चर्चेसाठी तयार पण कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगत नाटोच्या नियमानुसार चर्चेची तयारी असल्याचे स्पष्ट केले.

जर चर्चेची शक्यता असेल चर्चा होवू शकते आणि रशिया आपच्याशी कोणत्याही पूर्वग्रह आणि अटी व शर्तीशिवाय चर्चा करणार असेल चर्चेसाठी आम्ही घाबरणार नसल्याचे त्यांनी एका जागतिक वृत्त संस्थेला फोनवरील एसएमएसद्वारे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

आमची चर्चेची तयारी आहे ती केवळ आम्हाला शांतता हवी आहे म्हणून असेही त्यांनी सांगितले.

सोव्हिएत युनियन मधून बाहेर पडताना युक्रेनने आपले अणु शस्त्रास्त्र रशियाला देवून टाकले होते. पण युक्रेनने नाटो संघटनेचे आणि युरोपियन महासंघाचे सदस्यत्व स्विकारले नाही. मात्र आता युक्रेन या दोन्ही संघटनांचा सदस्य होण्यासाठी तयार आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *