Breaking News

विशेष बातमी

सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील आदेश होईपर्यत पदावनत न करता पदोन्नती मिळणार सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या रिक्त जागा भरणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कोणताच निर्णय दिलेला नसल्याने राखीव आणि खुल्या प्रवर्गातील सर्व जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या यादीत वरच्या स्थानी आलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना पदावनत न करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला असून त्यासंबधीचा आदेश …

Read More »

सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार राज्यांना नाहीत सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणप्रश्नी निर्णय

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय अयोग्य ठरवित एखाद्या जातीला आणि जमातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे ठरविण्याचे अधिकार १०२ व्या घटनादुरूस्तीनुसार राज्य सरकारला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठाने ३:२ या मताने निर्णय दिला. त्यामुळे राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण आता संपुष्टात आले. …

Read More »

रेशनिंग दुकानातून माल घ्यायचाय? मग आता अंगठा लावण्याची गरज नाही राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, कोरोनाची दुसरी लाट व त्याच्या संसर्गाने बाधित होत असलेल्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनामार्फत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा विचार करता सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील लाभार्थी तसेच रास्त भाव दुकानदार यांना कोरोनाचा संसर्ग होऊ …

Read More »

पुनावाला म्हणतात, रात्रीत उत्पादन वाढवणे शक्य नाही लस पुरवठ्यावरून निर्माण झालेल्या गोंधळावर पुनावाला यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबई: प्रतिनिधी लसींचा पुरवठा करण्यावरून एका राजकिय पक्षाच्या नेत्याकडून धमकीचा फोन आल्याचा गौप्यस्फोट सीरम इन्स्टीट्युटचे सीईओ अदार पुनावाला यांनी करताच यावरून एकच गदारोळ निर्माण झाला. त्यावर विविध राजकिय पक्षांनी पुनावाला यांना कोणी फोन केला याचा खुलासा करण्याची मागणी करण्यास सुरु झाली. अखेर याप्रश्नी आपले मौन सोडत रात्रीत लसींचे उत्पादन वाढविणे …

Read More »

धनजीशा बोमनजी कूपर ते उद्धव ठाकरे : महाराष्ट्राच्या नेतृत्वाची वैभवशाली परंपरा ! ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांनी घेतलेला ६१ वर्षातील मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीचा आढावा

‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा !’ १ मे १९६० या दिवशी एकशे सहा बहाद्दरांनी आपल्या प्राणांची ‘आहुति’ देऊन आपल्याला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून दिला. संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठे आंदोलन उभे राहिले होते. श्रीधर महादेव तथा एस.एम. जोशी, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, भाई श्रीपाद अमृत डांगे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, सेनापती …

Read More »

परिस्थितीकडे गांभीर्याने पहा न्यायालयाचे केंद्राला आदेश लसीकरणावरून मोदी सरकारला झापलं

नवी दिल्ली-वृत्तसंस्था: प्रतिनिधी देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. अस्ट्रा झेनका ही लस अमेरिकेत स्वस्त दरात मिळत असताना त्याच लसीसाठी भारतात मात्र जास्त दराने का घ्यायची? असा थेट सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला करत कोरोनाचा सामना करण्यासाठी नॅशनल इम्युनेशन प्रोगाम राबवावा आणि याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे आदेशही न्यायालयाने केंद्र सरकारला …

Read More »

राज्यातील जनतेला मिळणार मॉडर्ना, फायझर, स्पुतनिक, जॉन्सन अँड जॉन्सन लस? परदेशी लसींच्या खरेदीच्या अनुषंगाने चाचपणी

मुंबई : विशेष प्रतिनिधी १ मे महाराष्ट्र दिनापासून राज्यातील १८ ते ४४ वर्षावरील नागरीकांचे मोफत लसीकरण सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जरी घेण्यात आलेला असला तरी त्यासाठी लागणारा लसींचा पुरवठा सध्या तरी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टीट्युटकडून उपलब्ध होणे शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी अमेरिकन मॉर्डना,  फायझर, जॉन्सन …

Read More »

अखेर महाराष्ट्राकडून जागतिक निविदा प्रसिध्द, या दोन कंपन्यांना लसीसाठी पत्र आरोग्य विभागाकडून भारत बायोटेक्स, सीरम इन्स्टीट्युटला पत्र पाठवित विचारणा

मुंबई: विशेष प्रतिनिधी १ मे, महाराष्ट्र दिनापासून राज्यात १८ वर्षावरील नागरीकांसाठी लसीकरण करण्यास केंद्र सरकारने परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र लसीसह रेमडेसिवीर, ऑक्सीजन आणि लसीकरणासाठी केंद्र सरकारवर विसंबून न राहता महाविकास आघाडी सरकारने स्वत:हून पुढाकार घेत राज्यातील ५.७१ कोटी जनतेचे लसीकरण, बाधित रूग्णांना ऑक्सीजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करता यावा …

Read More »

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी महाराष्ट्राचे केंद्राच्या एक पाऊल पुढे लस आणि रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना भाजपाशासित आणि बिगर भाजपाशासित राज्यांमध्ये केंद्रातील मोदी सरकारकडून दुजाभाव करण्यात येत माहिती पुढे येत असतानाच आता राज्यातील कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने केंद्राच्या मदतीवर विसंबून न राहता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरून लस आणि रेमडेसिवीरची खरेदी करण्याची तयारी सुरु केली. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय: १० वीची परिक्षा अखेर रद्द मंत्रिमंडळ बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानंतर सीबीईएस, आयसीईएस केंब्रीज बोर्डांनाही याबाबत सूचना करत पुढील निर्णय घेण्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार या बोर्डांनी १० वी ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याधर्तीवर राज्यातील १० …

Read More »