Breaking News

विशेष बातमी

अखेर बारावीच्या परीक्षा रद्द ! मंत्री वडेट्टीवारांची अर्धी घोषणा उतरली सत्यात शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडून अधिकृत घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची घोषणा करत १२ वीची परिक्षाही रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे अनलॉकबाबत वडेट्टीवारांना युटर्न घ्यावा लागला. परंतु त्यांनी केलेली १२ वीची परिक्षा रद्दची घोषणा अधिकृतरित्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी …

Read More »

मोदी सरकार, लसीकरण धोरणाची संपुर्ण टिपणी-कागदपत्रे सादर करा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश

नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने जाहिर करत जानेवारी २०२१ पासून याची सुरुवात केली. मात्र देशातील अनेक राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेवरून निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेसंदर्भात असलेली कागदपत्रे, प्रशासनाच्या टिपणी सर्व काही सादर करा असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज मोदी सरकारला दिले. …

Read More »

मराठा समाजाला दिलासा: ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ मिळणार आर्थिक दृर्बल घटकांसाठीच्या आरक्षण आदेशात सुधारणा- राज्य शासनाचा शासन निर्णय जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश व शासन सेवेतील सरळ सेवेच्या नियुक्त्यांमध्ये १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले असून यामध्ये सुधारित आदेश आज काढण्यात आले आहेत. आता सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील (एसईबीसी) अर्थात मराठा समाजातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटकात आरक्षणाचा लाभ देण्याचा …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट सदिच्छा भेट घेतल्याची फडणवीसांचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे एकमेकांशी सहजरीत्या भेटणे इतके सोपे नाही. मात्र भाजप नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. गेल्या …

Read More »

BreakTheChain नुसार असे राहणार जिल्हानिहाय लॉकडाऊन आणि निर्बंध शिथिल कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार

मुंबई : प्रतिनिधी ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी …

Read More »

मराठा आंदोलन: मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील एकास १५ जूनपर्यंत हजर करून घ्या एसटी महामंडळाकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जवळपास ८१ हून अधिक आंदोलनकर्त्यांनी आपला प्राण गमावला. अशा मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीस शैक्षणिक पात्रतेनुसार एस.टी.माहामंडळात नोकरी देण्यात येणार असून ही कार्यवाही १५ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश सर्व एसटी डेपोंना एसटी महामंडळाने दिल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी …

Read More »

#BreakTheChain आनंदाची बातमी: टप्प्याटप्प्याने निर्बंध उठविणार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आणि बाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी राज्यात १४ एप्रिल २०२१ रोजीच्या रात्री ८ वाजल्यापासून राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. येत्या १ जून २०२१ रोजी त्यास दिड महिने पूर्ण होत असून १ जूनपासून राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्या टप्प्याने उठविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

केंद्राच्या विरोधात WhatsApp ची दिल्ली उच्च न्यायालयात धाव गोपनियता, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याची भीती

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी संवाद आणि संपर्क साधण्यासाठी देशातील कोट्यावधी नागरीक वापरत असलेल्या WhatsApp वरील गुप्तता कायद्याचा, भाषण-अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान अर्थात आयटी कायद्याने धोक्यात येत आहे. त्याविरोधात WhatsApp ने नवी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असून पत्रकार, राजकिय व्यक्ती, कार्यकर्त्ये यांचे भविष्य धोक्यात येणार असल्याची भीती याचिकेद्वारे …

Read More »

पदोन्नतीतील आरक्षण: न्यायालयाने दिली सरकारला दोन आठवड्यांची मुदत मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील मागासवर्गीय कर्मचारी-अधिकाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याप्रश्नी राज्य सरकारने ७ मे आणि १० मे रोजी शासन निर्णय प्रसिध्द करत रिक्त असलेल्या पदोन्नतीतील जागा सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या याच निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशनद्वारे आव्हान देण्यात आल्याने यासंदर्भात दोन आठवड्यात उत्तर द्यावे असे आदेश …

Read More »

#BreakTheChain अंतर्गत आता ही दुकानेही उघडी राहणार अत्यावश्यक प्रवर्गात समावेशाचे राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी १५ मे  ते २० मे च्या दरम्यान झालेल्या वादळामुळे प्रभावित झालेल्या किंवा तोंडावर आलेल्या पावसाळ्यात प्रभावित होण्याची शक्यता असणाऱ्या बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची दुरुस्ती / मजबुतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याशी संबंधित दुकाने / व्यवसाय यांचा समावेश अत्यावश्यक प्रवर्गात करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या प्रसाराची शृंखला तोडण्यासाठी राज्य शासनाने १३ एप्रिल …

Read More »