Breaking News

विशेष बातमी

राज्यातील जनतेला मिळणार मॉडर्ना, फायझर, स्पुतनिक, जॉन्सन अँड जॉन्सन लस? परदेशी लसींच्या खरेदीच्या अनुषंगाने चाचपणी

मुंबई : विशेष प्रतिनिधी १ मे महाराष्ट्र दिनापासून राज्यातील १८ ते ४४ वर्षावरील नागरीकांचे मोफत लसीकरण सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जरी घेण्यात आलेला असला तरी त्यासाठी लागणारा लसींचा पुरवठा सध्या तरी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टीट्युटकडून उपलब्ध होणे शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी अमेरिकन मॉर्डना,  फायझर, जॉन्सन …

Read More »

अखेर महाराष्ट्राकडून जागतिक निविदा प्रसिध्द, या दोन कंपन्यांना लसीसाठी पत्र आरोग्य विभागाकडून भारत बायोटेक्स, सीरम इन्स्टीट्युटला पत्र पाठवित विचारणा

मुंबई: विशेष प्रतिनिधी १ मे, महाराष्ट्र दिनापासून राज्यात १८ वर्षावरील नागरीकांसाठी लसीकरण करण्यास केंद्र सरकारने परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र लसीसह रेमडेसिवीर, ऑक्सीजन आणि लसीकरणासाठी केंद्र सरकारवर विसंबून न राहता महाविकास आघाडी सरकारने स्वत:हून पुढाकार घेत राज्यातील ५.७१ कोटी जनतेचे लसीकरण, बाधित रूग्णांना ऑक्सीजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करता यावा …

Read More »

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी महाराष्ट्राचे केंद्राच्या एक पाऊल पुढे लस आणि रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना भाजपाशासित आणि बिगर भाजपाशासित राज्यांमध्ये केंद्रातील मोदी सरकारकडून दुजाभाव करण्यात येत माहिती पुढे येत असतानाच आता राज्यातील कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने केंद्राच्या मदतीवर विसंबून न राहता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरून लस आणि रेमडेसिवीरची खरेदी करण्याची तयारी सुरु केली. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय: १० वीची परिक्षा अखेर रद्द मंत्रिमंडळ बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानंतर सीबीईएस, आयसीईएस केंब्रीज बोर्डांनाही याबाबत सूचना करत पुढील निर्णय घेण्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार या बोर्डांनी १० वी ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याधर्तीवर राज्यातील १० …

Read More »

रेल्वेने प्रवासानंतर १५ दिवस होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक लांब पल्ल्याच्या गाड्यानी राज्यांतर्गत आणि जिल्ह्यातंर्गत जाण्यासाठी नियम

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहिर केली असून लांब पल्याच्या रेल्वे गाड्यांनी करणाऱ्यांसाठी आणि महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असेल तरी ४८ तास आधी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबरोबर आपल्या इच्छितस्थळी पोहोचल्यानंतर १५ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्याचे आदेश राज्य …

Read More »

कोंकणातील शिवाजी महाराजांचे किल्ले आणि कातळ शिल्पे होणार जागतिक वारसा ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोकडून तत्वत:स्वीकार

मुंबई : प्रतिनिधी युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दर वर्षी १८ एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ ही संकल्पना पुढे ठेऊन हा दिवस साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत सादर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोने तत्वत: स्वीकार …

Read More »

गुढी पाडवा दिनी मिरवणूका, प्रभात फेऱ्यांवर बंदी सण साजरा करा पण या नियमानुसारच-राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी

मुंबईः प्रतिनिधी हिंदू नववर्ष गुढी पाडव्याचा सण उद्या असून हा सण साजरा करण्यासाठी गृह विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार सकाळी ७ ते रात्रो ८ वाजण्यापूर्वी गुढी पाडव्याचा सण साजरा कऱणे अपेक्षित आहे. तसेच यादिवशी कोणत्याही स्वरूपाची बाईक रॅली, मिरवणूका, प्रभात फेरी काढण्यास राज्य सरकारने मज्जाव …

Read More »

मंत्री टोपे आणि वडेट्टीवारांच्या संकेताने जनतेत संभ्रमावस्था आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मदत व पुर्नवसन मंत्री वडेट्टीवारांचे संकेत

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील वर्षभरापूर्वी कोरोना विषाणूला रोखण्याच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे आधीच अडचणीत सर्वसामान्य नागरीक सापडला आहे. त्यात आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता पुन्हा कडक निर्बंध लागू केलेले असल्याने अप्रत्यक्ष रोजंदारी आणि हातावर पोट असणारे हवालदिल झाले असतानाच आता पुन्हा राज्यात तीन आठवड्यांचा …

Read More »

लसीकरणप्रश्नी शरद पवारांच्या भूमिकेपेक्षा प्रदेशाध्यक्ष, मंत्र्यांची भूमिका वेगळी पवार म्हणतात ते मदत करतायत तर मंत्री टोपे आणि प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणतात ते देतच नाही

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील लसीकरणाची अनेक केंद्र कोरोनाची लस उपलब्ध नसल्याने बंद ठेवण्याची पाळी आल्याची भूमिका राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडत महाराष्ट्राला मागणी पेक्षा कमी लसींचा पुरवठा केंद्राकडून करण्यात येत असल्याचे सांगत केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवरच थेट हल्ला चढविला …

Read More »

न्यायालयाचा शिक्कामोर्तब, देशमुखांवरील आरोपांची सीबीआयच चौकशी करणार अनिल देशमुख, राज्य सरकारची याचिका फेटाळली

नवी दिल्ली-वृत्तसंस्था: प्रतिनिधी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेची आवश्यकता आहे. तसेच हे आरोप करणारे आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते दोघेही वजनदार व्यक्ती असून आरोप हे गंभीर स्वरूपाचे असल्याने त्रयस्थ तपास यंत्रणेची गरज असून अनिल देशमुख आणि राज्य सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च …

Read More »