Breaking News

विशेष बातमी

सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह या व्यक्तींना आता दोन्ही आमदार निवास बंद विधिमंडळ सचिवांकडून आदेश जारी

मुंबई: विशेष प्रतिनिधी स्थानिक पातळीवर कामे मार्गी लागत नाहीत म्हणून मंत्रालयातील येवून कामे मार्गी लावण्यासाठी आणि दुर्धर आजारावरील उपचारासाठी राज्यभरातून मुंबईत येणाऱ्यांचे हक्काचे ठिकाण म्हणजे मंत्रालयाच्या जवळील आमदार निवास. परंतु आता मुंबईसह राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध आमदारांचे कार्यकर्त्ये, कामानिमित्त येणारे नागरीक, उपचारासाठी रूग्ण या सर्वांसाठी मंत्रालयाजवळील आकाशवाणी आमदार निवास, …

Read More »

रश्मी शुक्लांपाठोपाठ परमबीर सिंग प्रकरणावरून भाजपा बॅकफूटवर फडणवीसांच्या आरोपातील हवा गुल

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर आणि पोलिस दलातील बदल्यांप्रकरणी भाजपाने केलेल्या महाविकास आघाडीला चांगलेच धारेवर धरत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली. मात्र या दोन्ही प्रकरणात गृह विभागाने केलेले स्पष्टीकरण आणि मुंबई …

Read More »

गुन्हा का नोंदवला नाही? न्यायालयाकडून परमबीर सिंगांवर प्रश्नांची सरबती सेशन कोर्टात जाण्याचे दिले निर्देश

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आपण आरोप केलात. परंतु त्या संदर्भात एफआयआर का दाखल केला नाही ? अशी विचारणा करत गृहमंत्र्यांनी तुमच्यासमोर सदर १०० कोटी रूपये गोळा करण्यासंबधी विचारणा केली होती का? जर सदरची माहिती ऐकिव स्वरूपात असेल तर त्याबाबतचे पुरावे आहेत का? अशी प्रश्नांची सरबती मुंबई …

Read More »

बचाने की ताकद किसमे है? परमबीर सिंग आणि त्रिवेदी यांचे फोन संभाषण व्हायरल आयपीएस अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीतून वाचविण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची निवृत्त एसीपीला धमकीवजा विनंती

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात १०० कोटीं रूपयांच्या खंडणी वसुलीवरून राजकिय वर्तुळात खळबळ माजली असतानाच आपल्या गटातील तीन अधिकाऱ्यांना पोलिस दलाच्या विभागीय चौकशीतून वाचविण्यासाठी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी निवृत्त एसीपी त्रिवेदींना अधिकाऱ्याला फोन करून तक्रार मागे घेण्याबाबत विनंती वजा धमकी फोनवरून दिल्याची संभाषण क्लिप नुकतीच समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. फोनवमधील संभाषणात …

Read More »

अर्थचक्राला थांबा न देता लवकरच राज्यात लॉकडाऊन मंत्रालय, शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदीचेही निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसेच …

Read More »

भाजपाच्या आरोपांच्या खळखळाटाला मविआकडून थंडपणाने बांध मुख्य सचिवांच्या अहवालाने सुरुवात

मुंबई: विशेष प्रतिनिधी अँटालिया प्रकरणात मनसुख हिरेन यांचा मृत्यूदेह आढळून आल्यापासून राज्यातील राजकिय वातावरण सातत्याने तापत राहिले असून कधी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे तर कधी परमबीर सिंग यांचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आता पोलिस दलाच्या बदल्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून सातत्याने महाराष्ट्र कधी नव्हे …

Read More »

परराष्ट्र मंत्रालयात इंटर्नशिप करण्याची संधी आंतरवासिता अर्थात इंटर्नशिप धोरण जाहीर

मुंबई : प्रतिनिधी परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील सर्व राज्याकरिता आंतरवासिता धोरण जाहीर केले आहे. अलिकडेच ऑगस्ट २०१६ मध्ये मंत्रालयाच्या आंतरवासिता धोरणासंबंधी प्रकाशित नियमांचा व्यापक आढावा घेण्यात आला असून त्याचा मुख्य उद्देश म्हणजे एम ए ई वरती जास्त लक्ष केंद्रित करणे, आंतरवासितांना जास्त वाव मिळवून देणे, तसेच मंत्रालयाने आंतरवासितेसाठी (internship) निवडलेले उमेदवारांत …

Read More »

मुख्य सचिवांच्या अहवालात फडणवीस, रश्मी शुक्लांचे पितळ उघडे: वाचा अहवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अहवाल सादर

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालाच्या आधारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत महाविकास आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणावर आरोप केले. तसेच या भ्रष्टाचारात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर संशयाची सुई फिरविण्यात आली. मात्र याप्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांनी तपासणी केला असता …

Read More »

कॅन्सर रूग्णांसाठी टाटा रूग्णालयाला म्हाडाच्या १०० सदनिका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी दुर्धर अशा कॅन्सर आजारावर उपचारासाठी देशभरातील विविध भागातून मुंबईतील टाटा रूग्णालयात येतात. मात्र येथे रूग्णांच्या आप्तेष्टांना राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना परेल उड्डाणपुलाच्या खाली, फुटपाथवर कोठेही रहावे लागते. त्यामुळे रूग्णांच्या आप्तेष्टांची सोय व्हावी यासाठी म्हाडाकडून ३०० चौ.फुटाच्या १०० खोल्या टाटा रूग्णालयास देणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड …

Read More »

बांधकामासाठीचे साहित्य महागणार गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात जुलैपासून दीडपट वाढीचा- राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई: प्रतिनिधी इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या चुना, चुनखडी, दगड, बारीक खजी, मुरूम, कंकर, माती, विटांसाठीची माती, ग्रेनाईट वगळता इतर खनिजाच्या प्रतिब्रास दरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे आगामी काळात इमारतीच्या बांधकाम साहित्य आणि खर्चात वाढ होवून त्याचा परिणाम सदनिकांच्या किंमतीवर परिणाम होणार आहे. राज्य सरकारने घेतलेला …

Read More »