Breaking News

विशेष बातमी

लॉकडाऊन टाळायचा असेल तर मास्क वापरा, अन्यथा १० दिवसात लागू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा इशारा

मुंबई: विशेष प्रतिनिधी १५ दिवसापूर्वी राज्यात कोरोनाबाधितांची संख्या २ ते ३ हजाराच्या दरम्यान असायची. मात्र आज हि संख्या दुपटीने वाढत आहे. त्यास आपला गाफिलपणा कारणीभूत असून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा असे वाटत नसेल तर मास्क, सॅनिटायझर आणि शाररीक अंतर पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत पुढील ८ ते …

Read More »

राज्याच्या महसूल उत्पन्नात २५ ते २८ टक्के घट: मात्र कर्जात वाढ केंद्रानेही घेतला हात आखडता

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आगामी १ मार्च २०२१ पासून सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर वित्तीय परिस्थिती पुन्हा बिकट असल्याचे दिसून येत असून मागील ८ ते ९ महिने कडक लॉकडाऊन राहिल्याचा परिणाम म्हणून राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर तूट आली आहे. तरीही लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे काही प्रमाणात आर्थिक क्षेत्रे काही …

Read More »

खर्डी आणि अंबरनाथमधील जमिनीत एमआयडीसीतील कोणाचा रस? डोंगराळ आणि संवेदनशील पर्यावरण भागातील जमिनीची खरेदी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात उद्योजकांना सहजरीत्या जमिनी उपलब्ध व्हाव्यात यासाठी उद्योग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या एमआयडीसीकडून प्रत्येक जिल्ह्यात-शहरात जमिनीची खरेदी केली जाते. याचाच भाग म्हणून एमआयडीसीने वाशिंद-शहापूरच्या दरम्यान संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रात मोडणारी १ हजार एकर आणि अंबरनाथ मधील डोंगराळ असलेली जमिन जी कोणत्याही स्वरूपात उद्योग उभारणीसाठी अनुकूल नसताना का खरेदी केली …

Read More »

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही भाजपाचे युवक वॉरीअर्स व्हॉट्सअॅप ग्रुप आगामी विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर

मुंबई-नवी दिल्लीः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लखनौ येथील कार्यक्रमात बोलतानात उत्तर प्रदेशात युवकांचे व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मतपरिवर्तन करून ३०० जागा कशा जिंकल्या याची सांद्यत माहिती दिली. त्याधर्तीवर महाराष्ट्रातही राजकिय प्रवाहाच्या बाहेर असणाऱ्या युवकांना युवक वॉरीअर्स संकल्पनेच्या माध्यमातून भाजपा विचाराच्या आणि भाजपेतर विचाराच्या युवकांचे ग्रुप तयार करण्यात …

Read More »

राज्याच्या उद्योग आणि एमआयडीसीत चालतात फक्त “पवार” चे आदेश सातारचा पवार सांगेल तेच होणार विभागात

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात उद्यो(ग)जकांची गुंतवणूक वाढावी आणि रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने सरकारकडून उद्योग विभागाच्या मार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र राज्याच्या उद्योग आणि एमआयडीसी विभागात पवार नामक व्यक्तीची भलतीच चलती असून कोणत्याही सरकारी पदावर नसलेल्या या “पर्वतेष पवार” नामक व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टींना मंत्री कार्यालयापासून ते एमआयडीसीपर्यंत याच …

Read More »

मंत्र्याचा मुलगाच करतोय शासकिय बंगल्यावर बसून “भूषणा” वह कामगिरी भूखंडाचे श्रीखंड प्रकरणातही शिवसेनेचा मंत्री

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संशयाच्या भोवऱ्यात आल्यानंतर शिवसेना अडचणीत आली असतानाच आता याच पक्षाचा आणखी एक ज्येष्ठ मंत्री भूखंडाचे श्रीखंड खाण्याच्या प्रकरणात अडकण्याची शक्यता निर्माण झाली. या ज्येष्ठ मंत्र्याच्या मुलानेच एका खाजगी कंपनीच्या नावाखाली सरकारी बंगल्यात बसून “भूषणा” वह कामगिरी सुरू केल्याची …

Read More »

फडणवीसांच्या “त्या” निर्णयामुळे सरकारी तूट कमी करणे मुख्यमंत्र्यांना बनले अवघड दिलेली स्थगिती ४८ दिवसात घ्यावे लागली मागे

मुंबई : विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे आठ महिन्यात सर्वच वित्तीय क्षेत्रे बंद राहिल्याने राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर ताण आला. तसेच आर्थिक चणचण भासू लागली. यावर आर्थिक चणचणीवर मात करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या एका निर्णयाला विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्थगिती देत हा निर्णयच बदल्याचा प्रयत्न  केला. परंतु …

Read More »

राज्य सरकारही आता कोविडवरील लस आणणार : हाफकिन करणार संशोधन आधुनिकीकरण करण्यास शासन संपूर्ण मदत करणार-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी भारताला पोलिओ मुक्त करण्यात मोठा वाटा देणाऱ्या हाफकिन इन्स्टिट्यूटने गेल्या सहा महिन्यात जवळपास २८ कोटीहून अधिक लसीची निर्मिती केली आहे, ही बाब अभिनंदनीय नक्कीच आहे. मात्र राज्याची सध्याची परिस्थिती पाहता कोविडवरील लसीसाठी हाफकिन इन्स्टिट्यूटने संशोधन लवकर करणे आवश्यक असून लस तयार करण्यात हाफकिन इन्स्टिट्यूट यशस्वी ठरल्यास ही …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या ओएसडीविरोधात विनयभंगाची तक्रार दोन महिने झाले तरी म्हाडाकडून निर्णय नाही

मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळातील एकापेक्षा अधिक बायका केल्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री चर्चेत असताना आता राष्ट्रवादीच्याच आणखी एका मंत्र्याचा ओएसडी अर्थात विशेष कार्यकारी अधिकाऱ्याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सदरचा ओसएसडी हा मुलतः म्हाडाचा कर्मचारी असून याच प्राधिकरणाशी संबधित असलेल्या राष्ट्रवादी …

Read More »

तंगी असतानाही पालक मंत्र्यांच्या हट्टापोटी उभारली जातेय १०० कोटींची सरकारी इमारत सार्वजनिक बांधकाम खाते म्हणते पालकमंत्र्यांनी सांगितले तसा आराखडा

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील १० महिन्यापासून राज्यात कोरोनामुळे राज्य सरकारच्या तिजोरीतील गंगाजळीत पुरेसा कर महसूल जमा होत नसल्याने आधीच अडचणीत असलेल्या महाविकास आघाडीसमोर वित्तीय डोलारा संभाळण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच आता काँग्रेसचे मंत्री आणि चंद्रपूरच्या पालकमंत्र्यांनी तब्बल १०० कोटी रूपयांची जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्यास सुरुवात …

Read More »